एक्स्प्लोर

भाजपची ऑफर आली, पण अजून प्रवेशाबाबत विचार नाही : राणे

मुंबई : भाजपचा प्रस्ताव आलेला आहे. पण यासंबंधीत अजून काहीही मत जाहीर केलेलं नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत दिलं. जे राणेंना घेऊ नये बोलतात तेच ऑफर घेऊन येतात, राज्यात एकही पक्ष नाही की तो राणेंना घ्यायला तयार नाही, सर्व जण राणेंना पक्षात घ्यायला तयार आहेत, असंही राणेंनी सांगितलं. ''अहमद पटेलांनी भेट नाकारली ही अफवा'' दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना अहमद पटेलांसोबत भेटलो. अहमद पटेलांनी भेट नाकारली ही चर्चा खोटी आहे. मी दिल्लीला वेळ दिल्याशिवाय जातच नाही, असं स्पष्टीकरणही राणेंनी दिलं. काँग्रेसकडून नाराजीचं कारण विचारलं जातं. राज्यात काँग्रेसचं कामच नाही. सगळ्या निवडणुकात पराभव होतोय, त्यासाठी प्रयत्नही केले जात नाहीत. कार्यकर्ते हताश झाले आहेत. त्यांना ताकद देण्याचं कामही काँग्रेसकडून केलं जात नाही, असा घणाघात राणेंनी केला. संघर्षयात्रेवर सडकून टीका संघर्ष चाललाय बोलतात. कुणाविरोधात संघर्ष करताय ते पण सांगत नाहीत. मला कोकणातील संघर्षयात्रेचं नेतृत्व करण्याबाबत अद्याप काहीही सांगितलेलं नाही. संघर्षच होत नाही तिथे मी का नेतृत्व करु, शेतकऱ्यांच्या हिताचा संघर्ष होणार असेल तर मी तयार आहे, पण शेतकऱ्यांनी काय प्रतिसाद दिला ते सर्वांना माहित आहे. बजेट आणि सभागृह सोडून संघर्षयात्रा काढली. मी राहुल गांधींनाही याबाबत कळवलं आहे. संघर्षयात्रेतून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नाही, असंही राणे म्हणाले. ''शिवसेनेचे 17 आमदार बाहेर पडायला तयार'' दरम्यान नारायण राणेंनी शिवसेनेवरही सडकून टीका केली. शिवसेनेने पक्ष बांधणीसाठी शिवसंपर्क अभियान सुरु केलं आहे. पण शेतकऱ्यांसाठी असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरेच नाही, त्यांचे कोणीही नेते बोलतात त्यात दखल घेण्यासारखं काहीही नाही, असा घणाघात राणेंनी केली. शिवसेनेचे नेते काहीही झालं तरी दुसऱ्यावर आरोप ढकलतात. ऑफिसच्या क्लर्कवर केस दाखल करतात, असं म्हणत राणेंनी शिवसेने नेते रामदास कदम यांच्यावरही निशाणा साधला. (प्रश्न : राणे भाजपात प्रवेश करतील तेव्हा शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी चर्चा आहे) शिवसेना बाहेर पडली तरी शिवसेनेचे आमदार सत्तेत राहतील, कोणत्या मार्गाने ते कळेल तुम्हाला त्यावेळेला, म्हणून तर हे बाहेर पडत नाहीत. त्यांच्यातले 17 आमदार कुठल्याही क्षणी बाहेर पडायला तयार आहेत. ते आत्ताच सांगणार नाही, सांगितलं तर सावध होतील, असा गौप्यस्फोटही राणेंनी केला. पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
ऊस दराचा तिढा कायम! साखर कारखानदार 3150 वर ठाम, शेतकरी संघटनेची भूमिका काय? बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?  
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला

व्हिडीओ

Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
Embed widget