एक्स्प्लोर
VIDEO : नंदुरबारमधल्या शाळांमध्ये कॉपीचा सुळसुळाट

नंदुरबार : नंदुरबारमधील नवापूर तालुक्यात सध्या कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. शाळांमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान राजरोसपणे कॉपी सुरु होती. विसारवाडीतील माणिकराव गावित यांच्या संस्थेतला असाच एक व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला.
इथे बाहेरील विद्यार्थी खिडक्यांमधून आत बसलेल्या मुन्नाभाईंना कॉपी पुरवत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे हा गंभीर प्रकार सुरु असतानाही शाळा प्रशासनाने याची दखल घेतलेली दिसत नाही.
दरम्यान एबीपी माझाने दाखवलेल्या या बातमीची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. कॉपी प्रकरणासंदर्भात तातडीची बैठक बोलावली. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून केंद्र संचालक, बैठे पथकातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
महाराष्ट्र
क्राईम
























