एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारकडून 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा; अशी आहे कामांची यादी?

Namo 11 Program : या 11 कलमी कार्यक्रमाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Namo 11 Program : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. अशातच मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11 कलमी कार्यक्रमाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. तसेच, जाहीर करण्यात आलेल्या सर्व कामांवर आमचे लक्ष असणार असून, याबाबत नियोजन अंमलबजावणी चोख असेल. हे सगळं मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

असा आहे नमो 11 सूत्री कार्यक्रम...

  • महिलांना शासकीय योजनेचा लाभ : चाळीस लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडणे. 20 लाख महिलांना शक्ती गट जोडणी. पाच लाख महिलांना रोजगार आणि तांत्रिक प्रशिक्षण देणे. पाच लाख महिलांना उद्योग उभारण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे. तीन लाख महिलांना बाजारपेठ आणि ग्राहक उपलब्ध करून देणे
  • नमो कामगार कल्याण अभियान : 73 हजार बांधवांना कामगारांना सुरक्षा संच देणे भारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान
  • नमो शेततळी अभियान : शेतकऱ्याचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढवणे. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देणे मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारणे
  • नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियान : आत्मनिर्भर गाव विकसित करणे. शंभर टक्के बेघरांना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर बांधून देणे. तसेच 100 टक्के घरामध्ये शौचालय बांधून त्याचा वापर होण्यासाठी प्रयत्न करणे. 100 टक्के पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारणे. शंभर टक्के गरजू नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे. 100 टक्के महिलांना सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणे. पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनवणे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन आणि सहाय्य, ऑरगॅनिक उत्पादनासाठी विशेष बाजारपेठ, ऑरगॅनिक उत्पादन निर्यातीसाठी मार्गदर्शन, ऑरगॅनिक उत्पादन प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, 73 यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव.
  • नमो ग्रामसचिवाले अभियान : प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायती कार्यालयाचे बांधकाम करणे. 73 गावामध्ये ग्रामसचिवाय उभारणे. सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे. पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर होईल यासाठी नियोजन करणे. वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे. संपूर्ण गावाचे नियंत्रण कक्ष उभारणे.
  • नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान : 73 आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी, सुधारणा करणे आणि 73 विज्ञान केंद्र उभारणे. अत्याधुनिक संसाधने असणारी शाळा उभा करणे. वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षण देणे. अंतराळ विषयक मार्गदर्शन. विज्ञानातील महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन. महत्त्वाच्या शोधांबाबत माहिती. ए आय बाबत प्रशिक्षण. वर्ग सायन्सला टेलिस्कोप आणि डिजिटल बॉलद्वारे अंतराळ दर्शन
  • नमो दिव्यांग शक्ती अभियान :  73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणे : अभियान स्वरूपात दिव्यांगांचे सर्वेक्षण आणि ओळख निश्चित करणे. दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र परिवहन आणि रेल्वे पास आणि दिव्यांग यांना असलेल्या इतर सुविधा उपलब्ध करून देणे. दिव्यांगांना अवश्य साहित्य उपलब्ध करून देणे. दिव्यांगा करता राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देणे. दिव्यांग्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे. दिव्यांगाने व्यावसायिक उभारणीसाठी भांडवल आणि कर्ज उपलब्ध करून देणे. दिव्यांगांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे
  • नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान : 73 क्रीडा संकुल उभारणे. सुसज्य क्रीडा मैदाने आणि उद्यान उभारणे. मैदानी क्रीडा सुविधा देणे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सुविधा देणे. खेळाडू समुपदेशन आणि सक्षमीकरण करणे.
  • नमो शहर सौंदर्य करण अभियान : 73 ठिकाणी शहर सौंदर्यकरण प्रकल्प राबवणे. शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे तलाव रस्ते पदपथ दुभाजक चौकशा सार्वजनिक ठिकाणचे सौंदर्यकरण करणे. लोकसहभागाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण टिकून राहावे यासाठी प्रयत्न करणे.
  • नमो तीर्थस्थळे व गडकिल्ले संरक्षण कार्यक्रम :  73 पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करणे. ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार प्राथमिक सुविधा उपलब्ध डिजिटल दर्शन परिसर सुशोभीकरण आणि स्वच्छता
  • नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान : 73 गरीब व मागासवर्गीय वस्त्यांना सर्वांगीण विकास करणे: पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व मागासवर्गीय यांना पक्के घरे बांधून देणे. 100 टक्के पक्के रस्ते उभारणे. 100 टक्के घरांमध्ये वीजपुरवठा करणे. समाज मंदिर उभारणे त्यातून समाज प्रबोधनाचे काम होईल यासाठी प्रयत्न करणे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

PM Modi Birthday : तिकीट असूनही जेव्हा पंतप्रधान मोदी चक्क ट्रेनच्या फरशीवर झोपले! जाणून घ्या रंजक किस्सा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Embed widget