एक्स्प्लोर
Buldhana News : सिंदखेडराजा येथे सापडलेल्या शेषशायी विष्णूच्या मूर्तीचं पूर्ण रूप आलं समोर; इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याची चर्चा
Buldhana News : बुलढाण्यातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोरच उत्खनन करताना सापडलेल्या शेषशायी विष्णूच्या मूर्तीचं पूर्ण रूप आता समोर आलं आहे.

( Image Source :ABP Reporter/Buldhana )
1/9

सिंदखेड राजा येथे राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर सुरू असलेल्या उत्खननात शेषशाही भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची अतिशय सुंदर मूर्ती सापडली आहे.
2/9

या मूर्तीच्या भोवतालचं उत्खनन आता पूर्ण झालं असून मूर्तीचे पूर्ण रूप आता समोर आलेल आहे.
3/9

अतिशय रेखीव आणि सुंदर ही मूर्ती असून सहा फूट लांब आणि तीन फूट उंच अशी ही मूर्ती आहे.
4/9

या मूर्तीत समुद्रमंथनाचा सुद्धा देखावा दाखवण्यात आलेला आहे.
5/9

यात भगवान विष्णू शेषनागावर विराजमान होऊन बसले आहेत आणि लक्ष्मी त्यांच्या चरणाजवळ बसलेल्या आहेत.
6/9

ही मूर्ती अतिशय जड असल्याने आता फक्त ही मूर्ती बाहेर काढण्याचं काम बाकी आहे.
7/9

नुकतेच सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनना दरम्यान एक शिवमंदिर सापडलं होते. हे मंदिर तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर असल्याचा दावा सध्या करण्यात येतोय.
8/9

सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं, त्या दरम्यान हे तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर सापडलं होतं.
9/9

त्यानंतर आता येथील उत्खननात शेषशाही भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची अतिशय सुंदर मूर्ती सापडली आहे.
Published at : 23 Jun 2024 12:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
