एक्स्प्लोर

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?

Vidhan Parishad Election 2024 : मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने कोणत्या उमेदवारांमध्ये  विधान परिषदेच्या जागांसाठी लढत होणार? पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर...

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : मुंबई : लोकसभेनंतर (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्र (Maharashtra News) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2024) चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई (Mumbai News) आणि कोकण (Konkan News) पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे. या चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. त्यात पुढील निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे आहे तर, मतदानाची तारीख 26 जून आहे. 1 जुलैला मतमोजणी होईल. मात्र, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने कोणत्या उमेदवारांमध्ये  विधान परिषदेच्या जागांसाठी लढत होणार? जाणून घेऊयात सविस्तर... 

मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत 

  • ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट 
  • शिवनाथ दराडे : भाजप 
  • सुभाष मोरे : शिक्षक भारती  
  • शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
  • शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 

मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं प्रशासनातील अनुभव असलेले अधिकारी ज. मो. अभ्यंकर ज्यांना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे. तर कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीकडून स्वतः कपिल पाटील यांनी उमेदवारी न घेता  शिक्षक भारतीतील आपले सहकारी सुभाष मोरे यांना उमेदवारी जाहीर केली असून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दुसरीकडे  शिवसेना शिंदे गटानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीचा धर्म न पाळता शिंदे यांनी शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार घोषित केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार  शिवाजी नलावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आणि तेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या पाच  जणांच्या लढतीमध्ये बाजी कोण मारतं याकडे लक्ष असेल.  

मुंबई शिक्षक मतदारसंघातील एकूण मतदार

  • मुंबई शहरी भागांत 2 हजार 14 स्त्री, तर 511 पुरुष मतदार आहेत.
  • मुंबई उपनगरात 9 हजार 872 स्त्री मतदार, तर 3 हजार 442 पुरुष असे 
  • एकूण 15 हजार 839 मतदार 

मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये कोणात लढत? 

विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाला असून शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा अनिल परब यांनाच मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी आधी शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार होते. आता अनिल परब यांना भाजपच्या किरण शेलार यांचं आव्हान असणार आहे. 

मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी 

  • अनिल परब शिवसेना ठाकरे गट 
  • किरण शेलार : भाजप 

मुंबई पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार

मुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई शहर स्त्री मतदार 12 हजार 873 आणि पुरुष मतदार 17 हजार 969, तर एका तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश आहे. मुंबई उपनगर स्त्री मतदार 36 हजार 838 आणि पुरुष मतदार 52 हजार 987, तर तृतीयपंथी 5 
एकूण 1 लाख 20 हजार 673 मतदार आहेत.

कोकण पदवीधर मतदार संघात कोणासमोर कोणाचं आव्हान? 

विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच कोकण पदवीधर मतदारसंघ चर्चेत होता. मनसेनं कोकण पदवीधरमधून उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यामुळे भाजपची गोची झाल्याचं पाहायला मिळालं होतं. कोकण पदवीधर म्हणजे भाजपचा पारंपारिक मतदारसंघ. अशातच भाजपकडून मनसेची मनधरणी करण्यात आल्यानंतर मनसेच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला. सध्या तिथून निरंजन डावखरे आमदार होते. अशातच त्यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघांत प्रामुख्यानं दोन उमेदवारांमध्ये लढत 

  • निरंजन डावखरे : भाजप 
  • रमेश कीर : काँग्रेस 

कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा यादीसुद्धा भाजपकडे होती आणि त्या ठिकाणी निरंजन डावखरे हे आमदार म्हणून राहिलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात भाजपनं या मतदारसंघातून उभे गेला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीतून  शिवसेना शिंदे गट  सुद्धा आग्रही होता सोबतच मनसेने सुद्धा ऐनवेळी अर्ज मागे घेतला. निरंजन डावखरे यांना  आव्हान असेल काँग्रेसचे उमेदवार  रमेश कीर यांचा. शिवसेना ठाकरे गटाचे  उमेदवार किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत  आघाडी धर्म पाळला आणि रमेश कीर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील 

कोकण पदवीधर मतदार संघात एकूण मतदार

  • रायगड जिल्ह्यात स्त्री 23 हजार 356 आणि पुरुष 30 हजार 843, तर तृतीयपंथी 9 मतदार आहेत. 
  • रत्नागिरी जिल्हा स्त्री 9 हजार 228 आणि पुरुष 13 हजार 453 मतदारांची नोंद झाली आहे. 
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 हजार 498 स्त्री मतदार नोंदविले गेले आहेत, तर पुरुष मतदारांची संख्या 11 हजार 53 इतकी आहे. 
  • कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 2 लाख 23 हजार 225
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget