एक्स्प्लोर

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं

Maharashtra Politics: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये दीड तास बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनावर रणनीती आखण्यावर चर्चा, महायुतीतील किरकोळ वाद टाळण्यासंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती

CM, DCM Meeting At Varsha Bungalow : मुंबई : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), अजित पवार ((Deputy CM Ajit Pawar) यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. साधारण दीड तास झालेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. शुक्रवारपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन,  राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही (Cabinet Expansion) चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. अधिवेशनात विरोधक विविध मुद्यांवर आक्रमक होत सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, त्याला महायुती म्हणून कसं सामोरे जायचं यावर रणनीती आखण्यात आली.

महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील रात्री उशीरा चाललेली ही पहिली बैठक नाही. यापूर्वीही अशा दोन बैठका वर्षा बंगल्यावर झालेल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत झालेल्या बैठकीत तब्बल दीड तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. 

महायुतीची रात्री उशीरापर्यंत बैठक, नेमकं शिजतंय काय? 

विधान परिषद निवडणूक, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुतीतील अनेक मोठी नावं इच्छुक आहेत. त्यामुळे आता संधी कोणाला द्यायची? आणि त्यानंतर इतरांची नाराजी दूर कशी करायची? हा मोठा प्रश्न असणार आहे. या अनुषंगानं रात्रीच्या बैठकीत चर्चा झालेली असू शकते, असं बोललं जात आहे. 

विरोधकांकडून सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे कुठेतरी खोटा नरेटिव्ह मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचं महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. त्या दृष्टीनंही बैठकीत खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. 

दरम्यान, लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठका या महत्वाच्या मानल्या जात आहेत. 

आगामी विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठ्या बदलांची शक्यता?

महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकांमधील सुमार कामगिरीची दखल दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी घेतली असून आता महाराष्ट्रातील घडामोडींवर दिल्लीतून विशेष लक्ष ठेवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आणि अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार आहेत. 

पाहा व्हिडीओ : Shinde Fadanvis Pawar Meeting : वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांची बैठक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget