एक्स्प्लोर
साताऱ्यात व्हॅलेंटाईन डेलाच युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या
प्रेम प्रकरणातून युवकाची मुलीच्या नातेवाईकांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील येराड या गावात घडली आहे.
सातारा : जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असताना सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून युवकाची मुलीच्या नातेवाईकांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील येराड या गावात घडली आहे.
अक्षय जाधव असं या युवकाचं नाव असून तो पाटण तालुक्यातील बिबी या गावचा रहिवासी आहे. त्याचे बिबी या गावापासून काही अंतरावर असलेल्या येराड गावातील मुलीसोबत प्रेमसंबध होते.
या प्रेम संबंधांची माहिती मुलीच्या घरच्यांना लागल्यानंतर मुलीचा विवाह करण्याचा निर्णय घेतला गेला. मुलीचं लग्न ठरल्याचं समजल्यानंतर अक्षय संतप्त होता. त्याने फेसबुकवरही प्रेमभंग झाल्याबाबतच्या पोस्ट टाकल्या होत्या. त्याने काल संबधित मुलीला फोनही केला होता.
या सर्व प्रकारानंतर थेट अक्षयचा मृतदेहच मुलीच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर सापडला. शवविच्छेदनानंतर अक्षयची गळा दाबून हत्या झाल्याचं समोर आलं. हा खून मुलीच्या नातेवाईकांनीच केल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement