एक्स्प्लोर
Advertisement
खा. रवींद्र गायकवाड गायबच, शिवसैनिकांची उस्मानाबाद बंदची हाक
उस्मानाबाद/नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नसलेले उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड अद्यापही गायब आहेत. त्यांच्या पत्त्याबाबत अद्यापही कळू शकलेलं नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी आज उस्मानाबाद बंदची हाक दिली आहे. यासाठी उस्मानाबादमध्ये शिवसैनिकांकडून बाईक रॅली काढण्यात आली.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर रवींद्र गायकवाड यांना सर्व एअर लाईन्सने काळ्या यादीत टाकलं. त्यामुळे त्यांना विमान प्रवास करता येणार नाही. दिल्लीहून ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने ते मुंबईसाठी रवाना झाले होते. मात्र ट्रेनमधून वापीला उतरले असल्याची शक्यता आहे.
दरम्यान एअर इंडियाकडून दिशाभूल करण्यात येत असून क्लासबाबतचा वाद नव्हता तर सेवेबाबतच्या तक्रारीचा वाद होता, असं स्पष्टीकरण रवींद्र गायकवाडांनी पत्राच्या माध्यमातून दिलं आहे.
शिवसेनेची लोकसभेत लक्षवेधी
एअर लाईन्सने घातलेल्या बंदीविरोधात शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत लक्षवेधी मांडली. एअर लाईन्सने घातलेली बंदी ही बेकायदेशीर आहे. रवींद्र गायकवाड यांची चूक नव्हती हे एअर होस्टेसनेही सांगितलं आहे, असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला.
प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारल्यानंतर शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. मात्र या संपूर्ण घटनेची साक्षीदार असलेली एअर इंडियाच्या एअर होस्टेसने रवींद्र गायकवाड यांची बाजू मांडली आहे.
“शिवसेना खासदार ड्यूटी मॅनेजरचं गैरवर्तन थांबवण्याचा प्रयत्न करत होते. ड्यूटी मॅनेजरला शिडीवर ढकलण्याचा त्यांचा कोणताही इरादा नव्हता,” असं एअर होस्टेसने सांगितलं.
एअर होस्टेसच्या माहितीनुसार, “विमानातील सामान्य प्रवाशांप्रमाणे रवींद्र गायकवाड प्रवास करत होते. विमानाच्या क्रू मेंबरसोबत त्यांचं वर्तन सभ्य होतं. रवींद्र गायकवाड अचानक हिंसक होतील, याची अपेक्षा नव्हती. एअरलाईन्सच्या मॅनेजमेंट अधिकाऱ्याशी त्यांना बोलायचं होतं, म्हणून ते विमानातून उतरत नव्हते. त्यांना जे-क्लासचा बोर्डिंग पास दिला होता आणि त्याबदल्यात त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आलं होतं. या मार्गावरील विमानात सर्व जागा इकॉनॉमी सीटच होत्या.”
“याच कारणामुळे खासदार गायकवाड यांची ग्राऊंड स्टाफसोबत बाचाबाची झाली. यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेटण्याची मागणी केली, तेव्हा ड्यूटी मॅनेजर सुकुमार तिथे आले. ते प्रामाणिकपणे त्यांची ड्यूटी करत होते, पण त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने गोंधळ झाला. कदाचित खासदार रवींद्र गायकवाड यांनीही ती बाब चुकीच्या पद्धतीने घेतली. दोघांमधील बाचाबाचीचं रुपांतर मारहाणीत झालं,” असंही एअर होस्टेसने सांगितलं.
“यानंतर खासदाराने चप्पल काढली आणि ते सुकुमार यांना मारणार होते. त्यासोबतच गायकवाड सुकुमार यांना शिडीच्या दिशेने घेऊन जात होते. मला गायकवाड यांची भीती वाट नव्हती. कारण प्रवासादरम्यान ते मला ताई म्हणत होते. तसंच इतर महिला कर्मचाऱ्यांसोबतही विनम्रतेने वागत होते,” असं एअर होस्टेसने सांगितलं. यामुळेच एयर होस्टेसने पुढे जाऊन खासदार गायकवाड यांना थांबवलं. एअर होस्टेसने कायदा हातात घेऊ नका, असं सांगितल्यानंतर गायकवाड यांनीही ऐकलं आणि सुकुमार यांना सोडलं.
माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा, रवींद्र गायकवाडांना आदेश : सूत्र
मारहाण प्रकरणावर माध्यमांशी काहीही बोलू नये, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र गायकवाडांना दिले असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळेच रवींद्र गायकवाड संपर्कात नसावेत, असाही अंदाज लावला जात आहे.
काय आहे प्रकरण?
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.
विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.
मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली. पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कानउघडणी केली.
VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद
कोण आहेत रवींद्र गायकवाड?
- रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
- लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
- उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत
- रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
- दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
- तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला
चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाडांवर ‘अमूल’चा चित्रातून निशाणा
गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार
लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे
पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड
एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार
… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड
शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement