Morning Headlines 10th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
PM Modi at Ramtek : पंतप्रधान आज रामटेक दौऱ्यावर; शिंदेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार
PM Modi Ramtek Sabha : नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज नागपूरच्या (Nagpur) कन्हानमध्ये (Kanhan) सभा होणार आहे. कन्हान नागपूर आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या सीमेवर असल्यानं रामटेक (Ramtek), नागपूर आणि भंडारा गोंदिया (Bhandara-Gondiya) या तीन लोकसभा मतदारसंघासाठीची (Lok Sabha Election 2024) ही मोदींची एकत्रित सभा असणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येनं लोक या सभेत येतील, असा महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सभास्थळाची पाहणी केली. वाचा सविस्तर
खडसेंविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा आक्रमक; थेट राष्ट्रपतींनाच लिहिलं पत्र
Anjali Damania Write Letter to President: मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election) बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी आपापली रणनिती आखली असून जय्यत तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपशी (BJP) काडीमोड घेत तब्बल अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse News) लवकरच स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एवढंच नाहीतर या फक्त चर्चाच नाहीत, असे स्पष्ट संकेत स्वतः एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) दिले आहेत. तसेच, एकनाथ खडसे स्वगृही परतल्यानंतर भाजपकडून त्यांची नियुक्ती राज्यपालपदी केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना पत्र लिहिलं आहे. वाचा सविस्तर
मोठी बातमी : मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंच्या शिलेदाराचा जय महाराष्ट्र! म्हणाले, "निर्णायक क्षणी राजसाहेबांनी..."
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) बिनशर्त पाठिंबा देताच राज ठाकरेंच्या शिलेदाराने 'जय महाराष्ट्र' केला आहे. राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील (MNS Gudi Padwa Melava) भूमिकेनंतर मनसेच्या (MNS) सरचिटणीस (General Secretary) किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी राजीनामा दिला आहे. अलविदा मनसे म्हणत किर्तीकुमार शिंदे यांनी मनसेला रामराम केला आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप-मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं आणि आज अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी राजसाहेबांनी भूमिका बदलली, असं किर्तीकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर
Sudhir Mungantiwar : मोठी बातमी : सुधीर मुनगंटीवारांची अडचण वाढणार?; काँग्रेसबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल
Sudhir Mungantiwar Controversial Statement : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) प्रचारसभेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून (Controversial Statement) भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या (Sudhir Mungantiwar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुनगंटीवारांच्या वक्तव्याची थेट निवडणूक आयोगाने (Election Commission) दखल घेतली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटरवर पोस्ट करत, निवडणूक आयोगाला टॅग करून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या याच पोस्टला उत्तर देत निवडणूक आयोगाने 'आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे' असे उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर
महाराष्ट्रात माझीच खरी काँग्रेस, भाजपच्या उमेदवारासाठी पटोलेंची 'नुरा कुस्ती'; अपक्ष उमेदवाराच्या दाव्यानं खळबळ
Sevak Vaghaye on Nana Patole : भंडारा : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra News) माझीच खरी काँग्रेस (Congress), राहुल गांधींना (Rahul Gandhi) भेटून पाठिंबा मागणार, असं वक्तव्य अपक्ष उमेदवार सेवक वाघाये (Sevak Vaghaye) यांनी केलं आहे. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नाना पटोलेंनी (Nana Patole) माझी राजकीय हत्या केलीय, असा घणाघाती आरोप सेवक वाघाये यांनी केला आहे. वाचा सविस्तर...
Rain News : अवकाळी पावसानं झोडपलं! मराठवाड्यात यलो, तर विदर्भात ऑरेंज अलर्ट
मुंबई : देशासह राज्याच्या हवामानात (Weather Update) गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. मार्चमध्ये उन्हाच्या झळा बसल्यानंतर मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. देशासह राज्यात रविवारपर्यंत पावसाचा (Rain Alert) अंदाज कायम आहे. देशात काही भागांना अवकाळी पावसाने (Rain Prediction) झोडपलं आहे, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हेरावून गेला आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाने ढग दाटले असताना मुंबईसह किनारपट्टीभागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर...
IPL 2024 : रोहित मुंबईसोडून लखनौमध्ये जाणार? LSG कोच जस्टिन लँगरंचं वक्तव्य मनं जिंकतील!
Rohit Sharma Leave Mumbai Indians, IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्ससोबत चांगल्या-वाईट घटना घडत आहे. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढलं, हार्दिक पांड्याकडे धुरा सोपवली. मुंबईला लागोपाठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागाला. रोहित शर्मा नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यातच मुंबईने पहिला विजय मिळवल्यानंतर रोहितने हार्दिकचे कौतुक केले. या सर्व घडामोडी सुरु असतानाच रोहित शर्मा आगामी हंगामात मुंबईची साथ सोडणार, अशा चर्चेनं जोर धरला. याबाबत लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य कोच जस्टिन लँगर यांनी केलेले वक्तव्य सर्वांचं मन जिंकणारं आहे. वाचा सविस्तर...
Horoscope Today 10 April 2024 : आजचा दिवस 'या' राशींसाठी शुभ; मिळणार प्रगतीच्या संधी, वाचा बुधवारचे राशीभविष्य
Horoscope Today 10 April 2024 : पंचांगानुसार, आज 10 एप्रिल 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा दुसरा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...