एक्स्प्लोर

Rain News : अवकाळी पावसानं झोडपलं! मराठवाड्यात यलो, तर विदर्भात ऑरेंज अलर्ट

IMD Weather Forecast : राज्यात आजही पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील.

मुंबई : देशासह राज्याच्या हवामानात (Weather Update) गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. मार्चमध्ये उन्हाच्या झळा बसल्यानंतर मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. देशासह राज्यात रविवारपर्यंत पावसाचा (Rain Alert) अंदाज कायम आहे. देशात काही भागांना अवकाळी पावसाने (Rain Prediction) झोडपलं आहे, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हेरावून गेला आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाने ढग दाटले असताना मुंबईसह किनारपट्टीभागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात या भागात पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आजही पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये  तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबईतील कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 22°C च्या आसपास असेल.

विदर्भात ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात यलो अलर्ट

परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला,  भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांना आयएएमडीकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भारतीय हवामान विभागाने अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे.

एप्रिल-जूनमध्ये उष्णतेची लाट

एप्रिल महिन्याच्या शेवटी तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एप्रिल-जूनमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारताच्या बहुतेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या शक्यता आहे. एप्रिल महिन्यामध्ये दक्षिण द्वीपकल्पातील अनेक भागात आणि उत्तर पश्चिम, मध्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागांत तापमानात मोठी वाढ दिसून येईल.

या भागात उष्णतेची लाट

भारतीय हवामान खात्याने (IMD) देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती जाहीर केली आहे. ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, पूर्व तेलंगणा, उत्तर तामिळनाडू आणि उत्तर कर्नाटक या भागात उप्षणतेची लाट पाहायला मिळणार आहे. आयएमडीने किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Monsoon : यंदाचा मान्सून कसा असेल? काही राज्यांमध्ये कमी पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
Accident News : नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Meet Massajog Citizen : सुरेश धस यांनी घेतली मस्साजोगवासीयांची भेट, मस्साजोगवासीयांनी काय मागण्या केल्या? धस काय म्हणाले?Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट : 22 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 22 February 2025ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 22 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
Accident News : नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
Manoj Jarange : मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगेंनी डागली तोफ; म्हणाले, 'माझ्यासाठी तो विषय...'
मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगेंनी डागली तोफ; म्हणाले, 'माझ्यासाठी तो विषय...'
Stock Market : एका वर्षात पैसे दुप्पट, आता शेअरची विभागणी होणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा स्टॉक कोणता?
एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलं, पैसे दुप्पट बनवले, आता शेअरची विभागणी होणार
Kash Patel New FBI Director : FBI संचालक काश पटेलांनी उजव्या हातात गोफ अन् भगवतगीतेला स्मरुन घेतली शपथ, पण डाव्या बाजूला उभी राहिलेली 'ती' कोण?
FBI संचालक काश पटेलांनी उजव्या हातात गोफ अन् भगवतगीतेला स्मरुन घेतली शपथ, पण डाव्या बाजूला उभी राहिलेली 'ती' कोण?
Ganesh Utsav 2025 : पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
Embed widget