IPL 2024 : रोहित मुंबईसोडून लखनौमध्ये जाणार? LSG कोच जस्टिन लँगरंचं वक्तव्य मनं जिंकतील!
रोहित शर्मा आगामी हंगामात मुंबईची साथ सोडणार, अशा चर्चेनं जोर धरला. याबाबत लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य कोच जस्टिन लँगर यांनी केलेले वक्तव्य सर्वांचं मन जिंकणारं आहे.
Rohit Sharma Leave Mumbai Indians, IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्ससोबत चांगल्या-वाईट घटना घडत आहे. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढलं, हार्दिक पांड्याकडे धुरा सोपवली. मुंबईला लागोपाठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागाला. रोहित शर्मा नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यातच मुंबईने पहिला विजय मिळवल्यानंतर रोहितने हार्दिकचे कौतुक केले. या सर्व घडामोडी सुरु असतानाच रोहित शर्मा आगामी हंगामात मुंबईची साथ सोडणार, अशा चर्चेनं जोर धरला. याबाबत लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य कोच जस्टिन लँगर यांनी केलेले वक्तव्य सर्वांचं मन जिंकणारं आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये सर्व खेळाडू लिलावात उतरणार आहे, तुम्ही कोणत्या खेळाडूला संघामध्ये घेणार? असा प्रश्न जस्टिन लँगर यांना विचारण्यात आला. यावर जस्टिन लँगर यांनी दिलेले उत्तराने चाहत्याची मनं जिंकली आहेत. लखनौने याबाबतचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नेटकऱ्यांकडून जस्टिन लँगर यांच्या वक्तव्याचं कौतुक करण्यात येतेय, त्याशिवाय त्या व्हिडीओवर कमेंट्स अन् लाईक्सचा वर्षाव होत आहे.
आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन होणार आहे. रोहित शर्माला लखनौच्या ताफ्यात घेणार का? या प्रश्नावर बोलताना लखनौचे कोच जस्टिन लँगर म्हणाला की, " रोहित शर्माला लखनौच्या संघात मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. मुंबई इंडियन्समधून आम्ही त्याला लखनौच्या ताफ्यामध्ये आणू. पण त्यासाठी तुम्हाला वाटाघाटीमध्ये चांगलं असणं गरजेचं आहे. कारण, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून येथे कसा येईल याची मी कल्पना करू शकत नाही." जस्टिन लँगर असेही म्हणाला की आयपीएलमध्ये रोहित शर्माची मोठी किंमत आहे, याबाबत मला कल्पना आहे. तो फक्त षटकार-चौकार मारण्यात सक्षम नाही, तर विश्व स्तरावर तो एक यशस्वी कर्णधारही आहे. जस्टिन लँगर यांच्यामते आयपीएल 2025 मध्ये सर्वच संघ मोठ्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असतील.
Reaction of Justin Langer when asked about him Rohit Sharma for LSG in next year IPL🥹🔥
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 9, 2024
Save this tweet every team will be gone mad for Captain Rohit Sharma in next IPL auction 💪🔥pic.twitter.com/u3AngJig2o
रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार का ?
14 वर्षांनतर रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. सोशल मीडियापासून कट्ट्यावर याबाबतच्या चर्चा सुरु आहेत.आयपीएल 2024 आधी रोहित शर्माची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्सने 17 व्या हंगामाच्या आधीच रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हाकललं होतं. मुंबईच्या निर्णयानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करत नवा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रोल केले. सोशल मीडिया आणि मैदानातही हार्दिक पांड्याला टीकचा सामना करावा लागला.
2001, Gabba, Leadership and more - listening to Justin Langer speak is like an education. 😍💙
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 7, 2024
Presenting Baकैती Ep 1 with Shubham ! 🔥@TooYumm pic.twitter.com/4OCtOLYGcQ