Horoscope Today 10 April 2024 : आजचा दिवस 'या' राशींसाठी शुभ; मिळणार प्रगतीच्या संधी, वाचा बुधवारचे राशीभविष्य
Horoscope Today 10 April 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? जाणून घेण्यासाठी पाहा आजचे राशीभविष्य...
Horoscope Today 10 April 2024 : पंचांगानुसार, आज 10 एप्रिल 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा दुसरा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या
मेष (Aries Horoscope Today)
कामासाठी आवश्यक असणारे बळ आणि परिस्थितीवर मात करण्याची शक्ती आज तुम्हाला निश्चित मिळणार आहे. नसत्या काळजा करू नये.
वृषभ (Taurus Horoscope Today)
नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसर सोडू नये. दुसऱ्याच्या तंत्राने चालणे तुम्हाला जमणार नाही. थोडे नुकसान संभवते.
मिथुन (Gemini Horoscope Today)
नोकरी व्यवसायात थोडे धाडस करायला हरकत नाही. आर्थिक मान वाढेल. ज्यांचा मुख्यतः बोलण्याचा व्यवसाय आहे, त्यांना आर्थिक फायद्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या संधी मिळतील.
कर्क (Cancer Horoscope Today)
संततीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. उपासना मार्गात मन रमून जाईल. महिलांनी घरातील लोकांशी सख्य ठेवण्याचा प्रयत्न करावा.
सिंह (Leo Horoscope Today)
आज ज्येष्ठांनी पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक आहे. घरामध्ये काही कलात्मक बदल करण्याच्या मागे लागाल. त्यासाठी बराचसा खर्च करण्याची तयारी दाखवाल.
कन्या (Virgo Horoscope Today)
आज तुमच्या कलात्मक दृष्टीला आव्हान मिळेल. व्यवहारात भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यातील कल्पनाशक्ती तुम्हाला उत्तम काम करण्यास प्रेरणा देईल.
तूळ (Libra Horoscope Today)
कडक बोलून दुसऱ्यातील अवगुण शोधण्याचे टाळा. अतिस्पष्टवक्तेपणा गोत्यात आणण्याची शक्यता आहे. नोकरी धंद्यात शुद्ध वैचारिक भूमिका ठेवल्यामुळे दुरगामी फायदे होतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आजची समस्या ही तुम्हाला संधी असेल हे लक्षात ठेवा. कलाकार लोकांना कलेच्या दृष्टीने चांगली फळे मिळतील. महिला जरा जास्तच रसिक बनतील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
स्फूर्तीदायक घटना घडतील. संथ जीवनाचा तिटकारा येईल. सतत काहीतरी करावे असे वाटेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रतिकाराशी लढण्यात धन्यता मानाल.
मकर (Capricorn Horoscope Today)
उद्योग-व्यवसायात कष्टाचे डोंगर उपसावे लागले तरी सर्व करण्याची तयारी दर्शवाल. प्रयत्नाने यश नक्कीच प्राप्त होईल. मानापमान जरा जास्त टो कदार होतील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
स्वतःबद्दल नसत्या कल्पना करून घेऊ नका. कधीतरी अनाठाई उत्साह दाखवाल. घरामध्ये अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces Horoscope Today)
आज हटीवादी वृत्ती सोडून परिस्थितीशी दोन हात करायला सिद्ध होण्यातच पुरुषार्थ आहे. स्त्रियांना जोडीदाराशी जमवून घ्यावे लागेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: