एक्स्प्लोर

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामगारांना दमबाजी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं बारामती विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा केला. या दौऱ्यात विविध ठिकाणी त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मतदारांना शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. कामगारांना दमबाजी करणाऱ्यांना देखील त्यांनी इशारा दिला. मला त्या रस्त्यानं जायला लावू नका, असा थेट इशारा देखील त्यांनी दिला.

शरद पवार काय म्हणाले? 

आजचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाहीत. जो शेतकऱ्यांचं हित बघत नाही, त्याचं माझं जमत नाही. समाजकारण बदलायचं असेल तर अर्थकारण बदललं पाहिजे. अर्थकारण बदलायचं असेल तर शेतीचा धंदा सुधारला पाहिजे. शेतमालाच्या किंमती वाढल्या पाहिजेत, खत औषधाच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं परिवर्तन येईल आणि ते परिवर्तन आणायचं आहे. ते आपण सगळ्यांनी ठरवलं तर येऊ शकतं. त्यासाठी सत्ता परिवर्तन हा निकाल घ्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले. 

शरद पवार पुढं म्हणाले, मी महाराष्ट्रभर फिरतोय, लोकांची मनस्थिती बदलाला अनुकूल आहे. ते काम उद्याच्याला करायचं आहे, त्यासाठी नवी पिढी आणली पाहिजे. आम्ही याठिकाणी युगेंद्रची निवड केली. मी 1967 ला आमदार झालो, मला तुम्ही 30 वर्ष आमदार ठेवलं, त्यानंतर मी ठरवलं आता महाराष्ट्रात नको दिल्लीला जाऊ, त्यानंतर लोकसभेला तुम्ही निवडून दिलं. इथं काय करायचं अजितदादांच्याकडे देऊया, त्यांच्याकडे दिल्यावर कारभार त्यांनी सांभाळला. माझी 30 झाली, त्यांची 30 झाली आता पुढचे 30 काय करायचं सांगा? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. लोकांनी देखील मान्य असं उत्तर दिलं. 

मला त्या रस्त्यानं जायचं नाही.... कोणी वाचवायला येणार नाही : शरद पवार

मला चिठ्ठ्या आल्यात पतसंस्था चालक, कारखान्याचे संचालक, चेअरमन आणि बाकीचे लोक मतदारांना दम देतात. ते सांगतात, कामगारांना नोकरीवरुन काढू अशी धमकी देतात. माझी विनंती आहे जे कुणी संचालक असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील. या कारखान्याच्या संस्थेच्या हितासाठी माझ्याकडे पन्नास वेळा आले असतील. मी पक्ष बघत नाही, मी त्याची जात बघत नाही. माझ्या दृष्टीनं जात एकच ती म्हणजे शेतकरी होय. कुठलाही साखर कारखाना, सहकारी संस्था अडचणीत आल्यानंतर पक्ष बघितला नाही, माझ्या हातात सत्ता होती तोपर्यंत मी पक्ष बघितला नाही, काही बघितलं नाही. सरसकट मदत केली. त्याला तुमचा कारखाना अपवाद नाही, असं शरद पवार म्हणाले. 

तुमच्या सभासदांना, तुमच्या कामगारांना तुम्ही देता, आता कुणी दम दिला तर मला कळवा, मी येतो, तुमच्याबर त्यांच्या घरीच येतो, चेअरमन असो किंवा कुणी असो, आम्ही कधी चुकीच्या रस्त्यानं जात नाही. लोकशाहीत प्रचार करायचा, मत द्यायचा तुमचा अधिकार आहे. मी सकाळी एका चेअरमनला सांगितलं, त्यानं कामगारांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा दम दिला. मी त्याला फोन केला, बाबारे लोकशाहीत कुणाला मत द्यायचं, कुणाचा प्रचार करायचा हा त्याचा अधिकार आहे. लोकांना तुम्ही दमदाटी करायला लागला तर हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ज्या गावच्या बोरी, ज्या गावच्या बाभळी,त्यामुळं तुम्ही भानगडीत पडू नका. पुन्हा माझ्या कानावर बाब आली तर मी आहे या ठिकाणी, कुणी तुम्हाला वाचवू शकणार नाही. मला या रस्त्यानं जायचं नाही. माणसं आपली आहेत, चुकली असतील, कुणी तरी त्यांना दम दिला असेल त्यामुळं त्यांनी असं केलं असेल. त्यांना सांगणं आहे आपल्या भागात आतापर्यंत जे कुणी केलं नाही ते करु नका, असा इशारा शरद पवार यांनी दिला. 

कायद्यानं सर्वांना समान अधिकार आहेत. पंतप्रधान आणि तुम्हाला एकच मत आहे. मुख्यमंत्र्यांना देखील एक मत आहे. लोकशाहीच्या विरुद्ध कुणी जाऊ नका हे सांगणं आहे, असं शरद पवार म्हणाले. 

इतर बातम्या :

Sharad Pawar : शिंदे म्हणाले ते देता आहेत घेता नाही, तुम्ही द्या पण लोकांचा मताचा अधिकार खरेदी करण्यासाठी देऊ नका : शरद पवार

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget