राज ठाकरेंचा पहिल्याच प्रचार सभेत झंझावात, भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल
''संकटं येतात तेव्हा सगळीकडूनच येतात.
मुलगा अमित हॉस्पिटलमध्ये असल्याने बाहेर पडता आलं नाही.
पण आता तो ठिक आहे.
मुंबईनंतर नाशिक, पुणे आणि ठाण्याही सभा होतील.
मी नसताना उमेदवारांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली,
त्यांचं अभिनंदन'',
राज ठाकरे.
''नोटाबंदीने काय दिलं?'' पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदी केल्यानंतर 50 दिवसानंतर नवा भारत दिसेल असं सांगितलं होतं. मात्र तीन महिने झाले, पण काही बदलल्याचं दिसतंय का, असा सवालही राज ठाकरेंनी केला. नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.''भाजपकडे सध्या बक्कळ पैसा पैसा आहे.
तो पैसा कुठून आला. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे आमच्याकडे आहे,
तुमच्याकडे नाही, असा अर्थ होतो,''
राज ठाकरे.
पाच राज्यात निवडुका चालू आहेत. सगळीकडे कोट्यावधींचा व्यवहार रोखीने होतोय. कॅशलेस भारत कुठे गेला?, नोटाबंदीने काही दिलं तर नाहीच, शिवाय अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. एटीएमच्या रांगेत निष्पाप लोकांचे जीव गेले.'' ''नाशिकमध्ये पाच वर्षात झालं, ते मुंबईत 25 वर्षात झालं नाही'' सरकारकडे पैसा नाही, पण लोकांना आकर्षित करण्यासाठी केवळ जाहिरातबाजी सुरु आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तर मुंबई महापालिकेत केवळ आकडे दाखवले जातात, पण पैसा जातो कुठं ते कुणाच्याही लक्षात येत नाही, असा आरोप त्यांनी केला.''मुंबईत 100 कोटी रुपये दरवर्षी फक्त खड्डे बुजवायला दिले जातात.
खड्डे बुजवायला एवढे पैसे देणारी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे'',
राज ठाकरे.
मुंबईत शिवसेनेने भ्रष्टाचार केला असेल. पण भाजपही त्यांच्यासोबत सत्तेत आहे. शिवसेनेवर टीका करण्याचा भाजपला अधिकार नाही. भाजपच्या खिशात काही तरी गेलचं असेल ना, असा सवाल राज ठाकरेंनी केला. शिवाय शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावाखाली भ्रष्टाचार दडवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगल्यावर डोळा असल्याची टीकाही त्यांनी केली.''एका राज्याएवढं बजेट मुंबई महापालिकेचं आहे.
शिक्षण खात्यासह सर्वच खात्यांची अवस्था वाईट आहे.
मुंबईत मराठी शाळा बंद होऊन, उर्दू शाळांची संख्या वाढायला लागलीय.
कुणाची संख्या वाढतीये आणि कुणाच्या राज्यात हे होतंय, याचा विचार करावा'',
राज ठाकरे.
मुंबईत आज खेळायला मैदान नाही. पण यांनी स्वतःच्या नावाने क्लब उभे केलेत. त्यातून ते बक्कळ पैसा कमावत आहेत. मग मुंबईकरांच्या हाताला काय लागलं, असा सवाल राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपला केला. नाशिकच्या कामांचा दाखला जिथे लोकांनी संधी दिली, तिथे स्वतःला सिद्ध करुन दाखवलं. पाचपैकी दोन वर्ष सरकारने नाशिकला आयुक्त दिले नाही. तरीही व्यवस्थितपणे कारभार केला. चांगले रस्ते, चांगल्या योजना द्यायच्या असतील, तर देता येतात, असं म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर हल्ला चढवला.''नाशिकचे रस्ते, बोटॅनिकल गार्डन एकदा पाहा.
बोटॅनिकल गार्डन तयार करण्यासाठी टाटांनी मदत केली.
ते गार्डन पाहून रतन टाटांनीही पाठ थोपटली'',
राज ठाकरे.
भाषणातील महत्वाचे मुद्दे :- मुलगा अमित हॉस्पीटलमध्ये असल्यामुळे सभा सुरु करायला उशीर झाला : राज ठाकरे
- मी नसताना उमेदवारांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली, त्यांचं अभिनंदन : राज ठाकरे
- शिवसेना-भाजपमध्ये आज जी भांडणं चालू आहेत, त्याचा मुंबईशी काहीच संबंध नाही : राज ठाकरे
- सगळीकडे कॅश चालू आहे, कॅशलेस भारत कुठे गेला? : राज ठाकरे
- नोटाबंदीनंतर काय बदललं? पूर्वीचीच परिस्थिती कायम आहे, केवळ लोकांना त्रास झाला : राज ठाकरे
- नोटाबंदीने काय साध्य झालं, त्याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं : राज ठाकरे
- भाजपकडे सध्या असलेला पैसा कुठून आला? : राज ठाकरे
- भाजपची पार्टी विथ डिफरन्स म्हणजे आमच्याकडे आहे, तुमच्याकडे नाही : राज ठाकरे
- सरकारकडे पैसा नाही, फक्त लोकांसमोर जाहिरातबाजी चालू आहे : राज ठाकरे
- बाळासाहेबांच्या नावाखाली भ्रष्टाचार दडवण्याचं काम सुरु आहे : राज ठाकरे
- गेल्या पाच वर्षात काय काम केलं, त्याचं उत्तर द्या : राज ठाकरे
- नाशिकमध्ये पाच वर्षात झालं, ते मुंबईत 25 वर्षात झालं नाही : राज ठाकरे
- मुंबईत मराठी शाळा बंद होऊन उर्दू शाळा वाढताय : राज ठाकरे
- दरवर्षी 100 कोटी रुपये फक्त खड्डे बुजवायला देणारी मुंबई एकमेव महापालिका : राज ठाकरे
- पाचपैकी 2 वर्ष नाशिक महापालिकेला आयुक्तच दिला नाही, तरीही कारभार केला : राज ठाकरे
- चांगले रस्ते, चांगल्या योजना द्यायच्या असतील तर देऊ शकता : राज ठाकरे
- नाशिकचं बोटॅनिकल गार्डन पाहून रतन टाटांनीही पाठ थोपटली : राज ठाकरे
- शिवसेना-भाजपने आपापले क्लब उभे केले, मुंबईकरांच्या हाताला काय लागलं? : राज ठाकरे
- शिवसेनेने भ्रष्टाचार केला असेल, पण भाजपही त्यांच्याचसोबत आहे : राज ठाकरे