MHADA Exam Postpone LIVE : म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली! वाचा महत्वाच्या अपडेट्स
MHADA Exam Latest Update :जे विद्यार्थी म्हाडाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी निघाले असतील किंवा निघणार असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे

Background
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G
आव्हाड यांच्या या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बंद असताना विद्यार्थी आधीच शेकडो रुपये खर्चून नियोजन करून बसले होते. सरकारने प्रत्येक परीक्षार्थीच्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. आरोग्य विभागमध्ये पण तेच म्हाडामध्ये पण तेच. सरकारचा नियोजन शून्य कारभार आहे, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे.
आज म्हाडा साठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री ट्विट करून दिली आहे. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
काही दिवसांपूर्वी या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही दलाली पद्धत मोडीत काढण्यासाठी जी पदं भरायची आहेत. त्या परीक्षेची प्राथमिक परीक्षा आणि त्यातून गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांची मुख्य परीक्षा होईल असं जाहीर केलं होतं. यासोबतच त्या दलालांना उमेदवारांचे पैसे परत करा असा इशारा देखील दिला होता. आज ही परीक्षा होणं अपेक्षित होतं परंतु मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी काही तांत्रिक कारणास्तव आपण ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचं म्हटलं आहे.
पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी आरोपींना पकडला - जितेंद्र आव्हाड
म्हाडा पेपरफुटी प्रकरणाबाबत बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पेपरफुटीचा आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणावेळी आरोपींच्या संवादात म्हाडाच्या पेपरबाबत उल्लेख असल्याचं सांगितलं असून पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी आरोपींना पकडलं, असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पेपर फुटीवरुन टीका
भाजपमध्ये कोण मोठं कोण छोटे याचं मूल्यमापन मी करणार नाही
पण संजय राऊत यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत
शिवसेनेला गळती लागली आहे त्याकडे अधिक लक्ष द्या
संजय राऊत यांच्या विधानाला केंद्रीय मंत्री राणे यांचं प्रत्युत्तर
राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार?
राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? हाच मुळात प्रश्न आहे
गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्ष मागे गेलय
म्हाडा पेपर फुटीवर केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य























