Maharashtra Weather : उष्णतेच्या झळा आणि पाऊसही; राज्यात उकाडा वाढणार अन् वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता
येत्या पाच दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असेल
Maharashtra Weather : राज्यामध्ये (Maharashtra) येत्या पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
आज ढगाळ वातावरण जाणवेल
आज (25 एप्रिल) मुंबईमध्ये ढगाळ वातावरण जणवेल तसेच येत्या पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्हा आणि रायगड येथील भागामध्ये सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पाऊस पडू शकतो. सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार या दरम्यान पाऊस पडू शकतो. कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच बीड-परभणीमध्ये गुरुवारी पाऊस पडू शकतो. या काळात वाऱ्यांचा वेग जास्त असू शकतो.
'या' ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तडाखा
अकोला आणि बुलडाणा येथे मंगळवारी ते गुरूवारी या काळात उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी उष्णता वाढू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Loudspeaker Controversy : भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत
- load shedding : फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र भारनियमनमुक्त होता, मात्र आता पुन्हा लोडशेडिंग सुरू झालेय : चंद्रशेखर बावनकुळे
- load shedding : फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र भारनियमनमुक्त होता, मात्र आता पुन्हा लोडशेडिंग सुरू झालेय : चंद्रशेखर बावनकुळे
- देशात पुन्हा लॉकडाऊन? लोकांना मिळणार आणखी एक बूस्टर डोस? कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान करणार चर्चा