RanjitSinh Disale Live updates : ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना लोकल मनस्ताप! वाचा प्रत्येक अपडेट
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांची सध्या खूप चर्चा सुरु आहे. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर काही आरोप केले आहेत. त्यावर गुरुजींनीही आपली बाजू मांडलीय. पाहा प्रत्येक अपडेट
LIVE

Background
रणजितसिंह डिसले यांना परवानगी देण्यासाठी शिक्षण विभाग आज आणि उद्या सुरू राहणार
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परवानगी देण्यासाठी शिक्षण विभाग आज आणि उद्या ही चालू राहणार आहे. उद्या रविवारी सुट्टी असली तरी विभाग सुरू राहणार आहे.
सोलापूरच्या शिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा, डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला की नाही याची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची टीम नियुक्त
सोलापूरच्या शिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा, डिसले यांना खरंच ग्लोबल टीचर हा पुरस्कार मिळाला की नाही याची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची टीम नियुक्त करून त्याची चौकशी केली
त्या चौकशी अहवालात रणजित डिसले यांनी पुरस्काराची तपशील दिले नाहीत म्हणून कारवाई करा असा अहवाल शिक्षण विभागाला दिला
परितेवाडीच्या शाळेवर जाऊन पाच सदस्यीय सदस्याने दोन तास डिसले यांची चौकशी केली
रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा
डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश
डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश
https://marathi.abplive.com/news/maharashtra/ranjitsinh-disale-news-education-minister-varsha-gaikwad-directs-solapur-zp-ceo-to-go-abroad-for-disale-guruji-s-scholarship-1027457
आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला त्यांच्यावर कारवाईची भाषा केली जातेय -चंद्रकात पाटील
चंद्रकात पाटील म्हणाले, राज्यात कशाचा पत्ता कशालाच नाही, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला त्यांच्यावर कारवाईची भाषा केली जातेय, ज्यांनी चांगल काम केलं त्यांचं पुढे काय झाल हे ही माहिती नसतं. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली तर ते नोकरी सोडतीलच.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
