एक्स्प्लोर

Aurangabad News: अब्दुल सत्तारांच्या बॉलिंगवर इम्तियाज जलील क्लीन बोल्ड

Aurangabad : या दोन्ही नेत्यांमधील रंगलेल्या क्रिकेट सामन्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

Aurangabad News: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावतीने शहरातील आमखास मैदानावर खासदार चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, रविवारी रात्री या स्पर्धेचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते द्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी अब्दुल सत्तार आणि जलील यांनी क्रिकेटचा आनंद घेतला. मात्र सत्तार यांनी केलेल्या बॉलिंगवर इम्तियाज जलील क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांमधील रंगलेल्या क्रिकेट सामन्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

इम्तियाज जलील संस्थापक असलेल्या दुआ बँकेच्यावतीने आमखास मैदानावर स्पोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात क्रिकेट, शरीरसौष्ठव, फुटबॉल, कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेचे उद्घाटन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनावेळी अब्दुल सत्तार आणि जलील यांच्या क्रिकेट सामना देखील पाहायला मिळाला. ज्यात सत्तार यांनी बॉलिंग केली तर जलील यांनी बॅटिंग केली. मात्र सत्तार यांच्या पहिल्या बॉलवर शॉट मारणारे जलील दुसऱ्या बॉलवर क्लीन बोल्ड झाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांच्या नात्याची कायम चर्चा होते. 

मी स्वतः आऊट झालो...

तर यावर बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले की, सत्तार यांच्या बॉलवर मी आऊट झालो नसून, स्वतः  आऊट झालो होतो.अब्दुल सत्तार हे मला कधीच आऊट करणार नाही, ते मला नेहमीच जिंकवणार असल्याचा टोला जलील यांनी यावेळी लगावला. सोबतच पुढील 20 दिवस आमखास मैदानावर स्पोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर याच मैदानात फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती जलील यांनी यावेळी दिली. 

भाजपच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली...

जलील यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह राज्यमंत्री, आमदार, सनदी अधिकारी यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र भाजपच्या मंत्र्यांसह इतर आमदार आणि मंत्र्यांनी देखील याठिकाणी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. तर शिंदे गटाचे एकमेव मंत्री अब्दुल सत्तार याठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अनकेदा एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याची टीका झाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget