Maharashtra Breaking News 01 Junee 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
चंद्रपुर जिल्ह्यात आज पाच नवीन कोरोना बाधितांची नोंद
चंद्रपुर जिल्ह्यात आज पाच नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात दुसऱ्यांदा मौसमतील सर्वाधिक तापमानाची नोंद
चंद्रपुर जिल्ह्यात दुसऱ्यांदा मौसमतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज चंद्रपुरमध्ये 46.8 तापमानाची नोंद झाली आहे.
Nashik Major Accident : नाशिक येथील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
नाशिकच्या सप्तशृंगी गडाजवळील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर उलटून अल्टो कारवर पडल्याने तीन जण जागीच ठार झाले असून 10 ते 15 जण जखमी झाले आहे. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गडचिरोली:- राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांमध्ये वाद
गडचिरोली:- राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांमध्ये वाद... पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे तैनातीस होते दोन्ही जवान, दोघांच्या वैयक्तिक वादातुन एकमेकांवर रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती, घटनेत दोघेही मृत पावल्याची सूत्रांची माहिती,
श्रीकांत बेरड, बंडू नवथरे अशी आहेत मयतांची नावे, दोघेही दौंड पुणे येथील SRP कॅम्पचे जवान, वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल, दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात केले रवाना
Sourav Ganguly : सौरभ गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा
सौरभ गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण नवी इनिंग सुरू करणार असल्याचंही त्याने ट्विटरद्वारे जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
