एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंचा शपथविधी, राज ठाकरेंच्या आईंना अश्रू अनावर, उद्धवही भावूक
शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी, कुंदा ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला पर्मनन्ट मुख्यमंत्री मिळाला आहे. राज्याचे 29 वे तर शिवसेनेकडून तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला राज्यासह देशभरातील अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवले होते. या निमंत्रणाचा मान ठेवून संपूर्ण राज ठाकरे कुटुंबीय शिवतीर्थावर उपस्थित होते.
शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी, कुंदा ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अत्यंत भावनिक असा हा क्षण एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राज यांच्या आई या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या धाकट्या भगिनी आहेत. त्यामुळे कुंदा ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काकू-पुतण्या आणि मावशी-भाचा असं दुहेरी नातं आहे.
दरम्यान, 'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन शपथेला सुरुवात केली. बरोबर 6.40 वाजता उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वंदन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
उद्धव ठाकरेंच्या आत्या संजीवनी करंदीकर भावूक, बालपणीच्या आठवणींना उजाळा
'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'...उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची शपथ | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement