Holi Dhulivandan LIVE : सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह; जाणून घ्या प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स
धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आज सर्वत्र धुळवडीचा उत्साह आहे.. जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स..
LIVE
Background
Holi Dhulivandan Guidelines : होळीच्या (Holi 2022) दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा उत्साह असतो. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसमुळं (coronavirus) सणांवर निर्बंध असल्यानं साजरे होऊ शकले नाहीत. यंदा मात्र कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 तारखेला होळी आणि आज 18 तारखेला धुलिवंदनाचा सण निर्बंधमुक्त साजरा केला जाणार आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
राज्याच्या गृहखात्याकडून मार्गदर्शक सुचना व नवी नियमावली
-कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.
-एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.
-होळी, शिमग्यानिमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.
- तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
-कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं
कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्यानं मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. काल 17 तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला गेला. निर्बंध हटवल्यानं होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील विविध भागांमध्ये आपापल्या परंपरांनुसार होळी साजरी करण्यात आली.
संबंधित बातम्या
Share Market : दलाल स्ट्रीटवर रंगांची उधळण; Sensex मध्ये 1,047 तर Nifty मध्ये 311 अंकांची उसळण
Holi 2022 : होळी आधी आणि नंतर 'अशी' घ्या त्वचेची काळजी; फॉलो करा तज्ज्ञांनी दिलेल्या सोप्या टिप्स
बेळगाव शहरात रंगपंचमीचा आनंद डॉल्बीच्या दणदणाटात आणि रंगांची उधळण करून साजरा
Nana Patole News : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सुकळी गावी साजरी केली होळी
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी होळी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्याच्या आपल्या सुकळी या गावी साजरी केली. विविध रंगाची उधळण करीत नाना पटोले यांनी होळी उत्सव आपल्या कार्यकर्त्यांसोबत साजरा केला. विशेष म्हणजे नाना पटोले प्रत्येक सण आपल्या गावात येत कुटुंबीयांसोबत साजरा करत असल्याने गावात सुध्दा जल्लोषाचं वातावरण असते. यावेळी नानांनी गुलाल लावून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
PM Modi Holi Wishes: पंतप्रधान मोदींकडून होळीच्या शुभेच्छा...
आप सभी को होली की हार्दिक शुभकामनाएं। आपसी प्रेम, स्नेह और भाईचारे का प्रतीक यह रंगोत्सव आप सभी के जीवन में खुशियों का हर रंग लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) March 18, 2022
कल्याण डोंबिवलीत महिलांमध्ये रंग पंचमीचा उत्साह
गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक सणावर कोरोनाचं सावट होतं . घरात राहून अत्यंत साधेपणाने सण साजरे केले जात होते . मात्र यंदा कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने यंदा होळी व रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत . कल्याण-डोंबिवलीचा सकाळपासूनच नागरिकांमध्ये रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. कल्याणमधील बेतुरकर पाडा परिसरात चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी रंगपंचमी साजरी केली. जवळपास दोन वर्षांनी सण साजरा करत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या महिला आपल्या चिमुकल्या मुलांसह रंगपंचमी खेळत रंगाची उधळण करत होत्या