एक्स्प्लोर

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"

 नालासोपारा रेल्वेस्थानाकात मराठी दाम्पत्याकडून रेल्वेत मराठी बोलणार नाही अशी लेखी पत्रक लिहून घेतल्याचा मराठी एकीकरण समितीने आरोप केला आहे.  

मुंबई : नालासोपाऱ्यात मराठी दाम्पत्यावर दादागिरी करणारा रेल्वेचा टीसी निलंबन करण्यात आले आहे. रेल्वेत मराठी बोलणार नसल्याची लेखी हमी घेतल्याचा आरोप दाम्पत्याने केला होता.  अखेर मराठी एकीकरण समितीच्या ठिय्याला यश मिळाले आहे. रितेश मौर्या असं हिंदी भाषिक  टीसीचे नाव  आहे.  नालासोपारा रेल्वेस्थानाकात मराठी दाम्पत्याकडून रेल्वेत मराठी बोलणार नाही अशी लेखी पत्रक लिहून घेतल्याचा मराठी एकीकरण समितीने आरोप केला आहे.  

रेल्वे प्रवासी अमित पाटील आणि त्यांच्या पत्नी सोबत हा सर्व प्रकार रविवारी रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकात घडला आहे. ही घटना वसई विरार मराठी एकीकरण समितीला समजताच नालासोपारा रेल्वेस्थानाकात सोमवारी मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता. 

नेमके काय घडले?

टीसीने रेल्वेस्थानाकात पाटील दाम्पत्याला तिकीट तपासणीसाठी अडवले असता त्यांना टीसीची भाषा समजली नाही. त्यांना मराठी बोलण्यास सांगितले तर  हम इंडियन है हिंदी मे बोलेंगे, रेल्वे मे मराठी नही चलेगा अशी धमकी देत त्यांना आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवले. एवढच नाही तर पाटील दामपत्याकडून मराठी न बोलण्याचे लेखी लिहून घेतले होते. तर पाटील यांच्या पत्नीने काढलेला व्हिडीओ ही जबरदस्तीने डिलीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनसेची आक्रमक भूमिका

मनमानी कारभार सुरू आहे. ठोस भूमिका घ्यायला कुणी तयार नाही. मराठी माणसांसाठी लढणारी आणि संघर्ष करणारी मनसे आहे. सत्तेत बसणारा पक्ष आहे त्यांनी या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले नाही तर जनतेने त्यांना सत्तेतून उतरवायला हवं अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे. 

नेमके काय घडले? 

नालासोपारा रेल्वे स्टेशनवर असलेल्या रितेश मौर्या या टीसीने पाटील दाम्पत्याला  रेल्वे तिकीट दाखवण्यास सांगितले.  त्यानंतर अमित पाटील प्रवाशाने आपल्याला हिंदी येत नसून  मराठीत बोला असे टीसीला सांगितले मात्र मुजोर रितेश मौर्या या टिसीने मराठी (Marathi) बोलण्यास नकार दिला . प्रवाशासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पोलिसांनीही बोलावून अमित पाटील या प्रवाशाला धमकावण्यातही आले असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर प्रवाशाकडून यानंतर मी मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही, मराठी भाषेची मागणी करणार नाही असं लिहून घेतलं.

हे ही वाचा :

मोठी बातमी : विमान अन् रेल्वेत स्फोट होणार असल्याचं म्हणत एक-दोन नव्हे 36 ई-मेल, आरोपी जगदीश उईकेला पोलिसांच्या बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Embed widget