एक्स्प्लोर

मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मदरसा कायद्याला (madrasa act) सुप्रीम कोर्टानं ( supreme court) मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे

UP madrasa Act News : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मदरसा कायद्याला (madrasa act) सुप्रीम कोर्टानं ( supreme court) मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे. मदरशांचा मुख्य उद्देश शिक्षण देणं हाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. धार्मिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांना रोखू शकता येणार नाही.  मदरसा कायदा पूर्णपणे राज्यघटनेच्या अंतर्गत असल्याचं कोर्टांन म्हटलं आहे. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

मदाशांची मान्यता नाकारता येणार नाही, कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार, मदाशांची मान्यता नाकारता येणार नाही असे देखील कोर्टानं म्हटलं आहे. मात्र, मदरशांमध्ये योग्य सोयी-सुविधा असाव्यात आणि शिक्षणाची काळजी घेतली जावी, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मदरसा कायदा ज्या भावनेने आणि नियमाखाली बनवण्यात आला, त्यात कोणताही दोष नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे याला घटनाबाह्य म्हणणे योग्य नाही. दरम्यान, उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला राज्यातील विविध मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. 5 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळ कायदा-2004' रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देऊन सुमारे 17 लाख मदरसा विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता.

उत्तर प्रदेशात सुमारे 25 हजार मदरसे सुरू

उत्तर प्रदेशात सुमारे 25 हजार मदरसे सुरू आहेत. त्यापैकी सुमारे 16,500 मदरशांनी राज्य मदरसा शिक्षण परिषदेकडून मान्यता घेतली आहे. त्यापैकी 560 मदरशांना सरकारी अनुदान मिळते. त्याच वेळी, सुमारे 8500 मदरसे हे मान्यता नसलेले मदरसे आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अंशुमन सिंह राठोड नावाच्या व्यक्तीने मदरसा बोर्ड कायद्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राठोड यांनी या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयाने 22 मार्च रोजी निकाल दिला होता. यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन अॅक्ट 2004 हा 'संवैधानिक' असून धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करतो, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच, मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांचा सामान्य शालेय शिक्षण पद्धतीत समावेश करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. धार्मिक शिक्षणासाठी बोर्ड तयार करण्याचा किंवा कोणत्याही विशिष्ट धर्माच्या शालेय शिक्षणासाठी बोर्ड तयार करण्याचा अधिकार सरकारला नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! मदराशांतील शिक्षकांच्या पगारात तिप्पट वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह मुंबई विमानतळावर अटक
पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह अटक
Rohini Khadse : महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या
महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
Eknath Khadse : नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान : 02 March 2025 : ABP MajhaRaksha Khadse : एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुली बाळींचे काय?ABP Majha Headlines : 12 PM : 02 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut PC : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे फडणवीसांची तक्रार केली, संजय राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह मुंबई विमानतळावर अटक
पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह अटक
Rohini Khadse : महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या
महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
Eknath Khadse : नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...
भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 दिवसांत पाच राष्ट्रप्रमुखांना जाहीरपणे धमक्या, वादविवाद आणि फटकार; नेमकं यातून साध्य काय होणार?
भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 38 दिवसांत पाच राष्ट्रप्रमुखांना जाहीरपणे धमक्या, वादविवाद आणि फटकार; नेमकं यातून साध्य काय होणार?
Pune News : गोवा-हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर; चार तासांपासून रेल्वे वाहतूक खोळंबली, नेमकं काय झालं?
गोवा-हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर; चार तासांपासून रेल्वे वाहतूक खोळंबली, नेमकं काय झालं?
Rohit Pawar :....पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज; छावा चित्रपटाचा दाखला देत रोहित पवारांचं ट्विट, रोख कुणाकडे?
....पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज; छावा चित्रपटाचा दाखला देत रोहित पवारांचं ट्विट, रोख कुणाकडे?
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, संत मुक्ताई यात्रेतील धक्कादायक प्रकार
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, संत मुक्ताई यात्रेतील धक्कादायक प्रकार
Embed widget