एक्स्प्लोर

Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वत:च्या मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात. लोक काय बोलतील, आपल्याबद्दल काय विचार करतील? याचा विचार ते जास्त करतात.

Numerology Mulank 3 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 3 असलेल्या लोकांचीही काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.

मूलांक 3 चे लोक घाबरट असतात. ते इतरांचा विचार जास्त करतात, समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल याचा विचार ते करतात. मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. घाबरट असले तरी 3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेचे लोक फार महत्त्वकांक्षी देखील असतात. हवं ते मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते. मूलांक 3 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

अतिशय घाबरट असतात या जन्मतारखेचे लोक

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक हे स्वभावाने प्रचंड घाबरट असतात. ते सर्वांसमोर शांत राहतात आणि आपली चांगली प्रतिमा बनवतात. हे लोक दुसऱ्यांसमोर आक्षेपार्ह वक्तव्य करत नाहीत. आपण आक्षेपार्ह बोललो तर समोरचा काय बोलेल, आपल्याला काय समजेल ही भीती सतत त्यांच्या मनात असते. त्यामुळे हे लोक सांभाळूनच बोलतात. गरजेच्या वेळी ऑफिसमध्ये सुट्टी हवी असेल तर ती मागायला देखील हे लोक घाबरतात आणि मुकाट्याने काम करत राहतात.

कुणासमोर झुकणं यांना आवडत नाही

मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कुणासमोर झुकायला आवडत नाही. या मूलांकाच्या लोकांना कोणाचेही उपकार नको असतात किंवा त्यांना त्यांच्या कामात कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप आवडत नाही.

अत्यंत महत्वाकांक्षी असतात हे लोक

मूलांक 3 चे खूप महत्वाकांक्षी असतात, त्यांची मोठी स्वप्नं असतात. त्यांच्या ध्येयाप्रती ते एकनिष्ठ असतात. मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य करण्याची हिंमत त्यांच्यात असते. आपल्या प्रयत्नांच्या जोरावर ते हवं ते सर्व साध्य करतात. या मूलांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत. यासोबतच मूलांक 3 चे लोक हे धैर्यवान, शूर, सामर्थ्यवान, संघर्ष करणारे आणि कधीही हार न मानणारे असतात. हे लोक खूप महत्वाकांक्षी असण्यासोबतच चांगले विचार करणारे देखील असतात.

वाचन आणि लेखनाची असते आवड

मूलांक 3 असलेले लोक उच्च शिक्षण घेतात. हे लोक खूप अभ्यासू असतात, वाचन आणि लेखनात ते खूप हुशार असतात. या लोकांना विज्ञान आणि साहित्यात प्रचंड रस असतो. हे लोक अभ्यासात यशस्वी होतात. मात्र, या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. अनेकदा या लोकांना घरून आर्थिक मदत घ्यावी लागते. वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : अतिशय तापट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; अगदी क्षणात होतात हायपर, नेहमी नाकाच्या शेंड्यावर असतो राग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 12 May 2026: 12 मे चा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने मागोमाग शुभ योग, अचानक लॉटरीचे संकेत, रातोरात नशीब पालटेल
12 मे चा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने मागोमाग शुभ योग, अचानक लॉटरीचे संकेत, रातोरात नशीब पालटेल
Shani Sade Sati: फक्त 1 चं वर्ष कष्ट, नंतर राजासारखं जीवन! 2027 पर्यंत 3 राशींना शनि साडेसाती-ढैय्याचा डबल सामना, आयुष्यात 'असे' होतील बदल
फक्त 1 चं वर्ष कष्ट, नंतर राजासारखं जीवन! 2027 पर्यंत 3 राशींना शनि साडेसाती-ढैय्याचा डबल सामना, आयुष्यात 'असे' होतील बदल
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? कोणाचा भाग्योदय? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? कोणाचा भाग्योदय? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! 4 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! 4 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
Embed widget