एक्स्प्लोर

7th July Headline : राहुल गांधींच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी, भाजप आमदारांची बैठक; आज दिवसभरात

7th July Headline : मुंबईत भाजपच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. समीर वानखेडे यांच्या प्रकणात सीबीआय आपली भूमिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये मांडणार आहे.

7th July Headline : समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात  सीबीआय आपली भूमिका मांडणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा महाराष्ट्र दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. 17 जुलै पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी दुपारी बैठक पार पडणार आहे. 

भाजपच्या आमदारांची बैठक

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर भाजपचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.  याच पार्श्वभूमीवर भाजपने आज आपल्या सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बोलावली आहे.  या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. 

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत भिडे वाड्याची ती जागा राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचा ठराव मांडण्यात आला. साल 2008 मध्ये स्थायी समितीनं या जागेचं भूसंपादन करण्याची मान्यताही दिली. मात्र, त्यादरम्यान गाळेधारकांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. हायकोर्टानं साल 2015 आणि 2018 मध्ये राज्य सरकारला भूमिका मांडण्यास सांगितली होती.  तत्कालीन कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे वाड्यासंदर्भात वाद मिटवण्यात पुढाकार घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. 

पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक

17 जुलै पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर  पहिल्यांदाच या बैठकीत सर्वपक्षीय नेते येणार आमने-सामने येणार आहेत. मात्र शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकाही प्रतिनिधीला या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. तर काँग्रेस मधून बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण अमीन पटेल यांना आमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार जयंत पाटील या दोघांनाही आमंत्रण दिले आहे. 

समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी

समीर वानखेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणांत आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी जेष्ठ आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझवर एका न्याय दंडिधिका-यालाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यावर सीबीआयकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. 

विठुरायाची प्रक्षाळ पूजा

विठुरायाची प्रक्षाळ पूजा पार पडणार आहे. सलग 18 दिवस 24 तास दर्शनाला उभा असलेला विठुरायाला आता निद्रा मिळणार आहे. तसेच देवाचे राजोपाचार देखील सुरू होणार आहेत. 

राहुल गांधींना दिलासा मिळणार?

राहुल गांधींना दिलासा मिळणार? मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींविरोधातील शिक्षा माफीच्या खटल्यात आज निकाल. गांधींच्या माफीच्या अर्जावर गुजरात उच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

मणिपूरमधील मुद्द्यांवर भाष्य करण्यासाठी राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये ते इतर मुद्द्यांवरही भाष्य करणार आहेत. 

दोन वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी  गोरखपूर येथून दोन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दोन सेमी-हाय स्पीड ट्रेनमध्ये गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्सप्रेस आणि जोधपूर-साबरमती वंदे भारत एक्सप्रेस यांचा समावेश आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget