एक्स्प्लोर
Advertisement
आदिवासी समाजात समाविष्ट करा, गोवारी समाजाचा भव्य मोर्चा
गोवारी समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गोवारी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
गोंदिया | गोवारी समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गोवारी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हायकोर्टाने नुकताच गोवारी समाज आदिवासी असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र शासन न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज आंदोलन करण्यात आलं.
शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करुन गोवारी समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करावं आणि न्याय द्यावा यासाठी आज आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. गोंदियात जिल्हाधिकारी कार्यालयावर गोवारी समाजाने भव्य मोर्चा काढला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं.
शासनाने गोवारी समाजाला लवकर न्याय दिला नाही तर यापेक्षा भव्य आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
आदिवासी गोवारी समाजाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र शासनाने नेहमीच गोवारी समाजाला न्याय देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला जात आहे. समन्वय समितीने 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सत्याग्रह आंदोलनही सुरु केलं आहे. पहिल्या टप्प्यात तहसीलदारांना तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement