एक्स्प्लोर

6 फेब्रुवारीला एल्गार परिषदेसंदर्भातील पुढील सुनावणी : पुणे सत्र न्यायालय

एल्गार परिषदेसंदर्भातली पुढची सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा, तसंच तपास पुण्यातून मुंबईतल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात हलवण्यात यावा, यासाठी पुणे सत्र न्यायालयात केलेल्या अर्जावर ही सुनावणी सुरु आहे.

पुणे : एल्गार परिषदेचा तपास एनआयए कडे सोपवण्यात यावा यासाठी एनआयएने पुणे सत्र न्यायालयात केलेल्या अर्जावर आता सहा फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.  एनआयएच्या मागणीवर आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी आज आरोपींचे वकील आणि सरकारी वकिलांनी केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाची  सुनावणी गुरुवारी (6 फेब्रुवारी) करण्याचा निर्णय घेतला आहे. एनआयने या प्रकरणी जो नव्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये आत्ता अटकेत असलेल्या नऊ आरोपींची आणि  सध्या जामिनावर असलेल्या गौतम नवलखा आणि  आनंद तेलतुंबडे  यांची नांव आहेत.  अकरा आरोपी आणि इतरांनी मिळून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला असं एनआयएने म्हटल आहे. परंतु एनआयएने दाखल केलेल्या  या गुन्ह्ययामध्ये कबीर कला मंचच्या काही सदस्यांची नावं नाहीत. पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी एल्गार प्रकरणाची सुरुवातच मुळी कबीर कला मंचच्या सदस्यांवर गुन्हा दाखल करून केली होती. एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्यात कबीर कला मंचच्या सुधीर ढवळेचे नाव आहे. परंतु सागर गोरखे, रमेश गायचोर, हर्षाली पोतदार,  दिपक डेंगळे आणि ज्योती जगताप यांची नावं नाहीत.  त्याचबरोबर एनआयएने  दाखल केलेल्या गुन्ह्यात  देशद्रोहाचे कलम लावण्यात आलेलं नाही. एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या त्यांच्या अर्जासोबत पुणे पोलिसांनी या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी एल्गार प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरची प्रत देखील जोडली आहे. Koregaon Bhima | कोरेगाव-भीमाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होण्याची शक्यता | स्पेशल रिपोर्ट एल्गार प्रकरणातील तपासाची कागदपत्रे आणि आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी एनआयएने पुणे न्यायालयात अर्ज केला होता. एल्गार प्रकरणाचा तपासाशी संबंधीत कागदपत्रे एनआयएला देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर तपासाची कागदपत्रे आणि आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी एनआयएने पुणे न्यायालात अर्ज दाखल केला. या अर्जामध्ये हा खटला मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात हलवण्याची मागणी केली आहे. संबंधित बातम्या : भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ : गृहमंत्री अनिल देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं, पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट

मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच

मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोपTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaDhananjay Mahadik : चिरंजीव कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक सागरवर साखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं, पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं, पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!

महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं

Belapur Vidhan Sabha: संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
Embed widget