एक्स्प्लोर

भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ : गृहमंत्री अनिल देशमुख

भीमा कोरेगाव प्रकरणी सरकारकडून सहकार्य मिळत नसल्यानं चौकशी आयोगानं कामकाज गुंडाळण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत राज्य सरकारने आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ दिलीय. गृहमंत्री अनिल देशमुखांनी याची माहिती दिलीय.

मुंबई : सरकारकडून सहकार्य मिळत नसल्यानं कोरेगाव भीमा चौकशी आयोगानं कामकाज गुंडाळण्याचा इशारा दिला होता. मात्र, राज्य सरकारनं आयोगाला थकीत रक्कम दिली असून, आयोगाची मुदत दोन महिन्यांनी म्हणजे आठ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी ही माहिती दिलीय. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी राज्य सरकारला यासंदर्भात पत्र लिहलं होतं. भीमा कोरेगाव प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगानं उद्विग्नता व्यक्त करत कामकाज गुंडाळण्याचा इशारा दिला होता. चौकशीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, कर्मचारी आणि भत्ते मिळत नसल्याची खंत कोरेगाव-भिमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती पटेल यांनी व्यक्त केली होती. आम्ही आयोगाचं कामकाज गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून तो मुख्य सचिवांना कळवण्यात येईल असं वक्तव्य पटेल यांनी केलं होतं. या इशाऱ्याची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. आयोगाच्या इशाऱ्यानंतर निर्णय -  कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ आज(शनिवारी)देण्यात आलीय. आठ फेब्रुवारीला आयोगाची मुदत संपणार होती, ती आता आठ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. वित्त विभागाकडून आयोगाची थक्कीत रक्कम देण्यात आली असून वेतन का थकवले? याची चौकशी केली जाईल. यामधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अतिरिक गृह सचिव या प्रकरणाची चौकशी करतील, असंही देशमुख यांनी सांगितले. एनआयएच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी - एनआयएने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होत असून राज्य सरकार आपलाही वकिल उभा करेल आणि आपली बाजू मांडेल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिलीय. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राज्य पोलीसांकडून एनआयएकडे सोपवला आहे. दरम्यान केंद्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्राने असा निर्णय घेण्यापूर्वी राज्याला विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र, केंद्र सरकारने असे केलेले नाही. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पावले उचलली जातील असं वक्तवया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. भीमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात एसआयटी स्थापन करण्याची मागणी शरद पवारांनी ही केली होती आणि त्यासंदर्भात आम्ही विचार करत असतानाच केंद्र सरकारने तपास काढून घेतला हे घटनाबाह्य कृती आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं. Koregaon Bhima | राज्य सरकारचं असहकार्य! चौकशी आयोग कामकाज गुंडाळणार? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुज, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुज, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget