एक्स्प्लोर
एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्राचे पहिले आयपीएस सुहेल शर्मा
मुंबई : महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांनी एव्हरेस्ट शिखर सर करुन एव्हरेस्टला गवसणी घालणारे महाराष्ट्रातील पहिले आयपीएस अधिकारी होण्याचा मान पटकवला आहे. औरंगाबादचे पोलीस हवालदार रफिक शेख यांनीही एव्हरेस्ट पादाक्रांत केला होता.
भारतीय पोलीस प्रशासकीय सेवेच्या 2012 च्या तुकडीचे अधिकारी असलेले सुहेल शर्मा हे 14 सप्टेंबर 2014 रोजी मेहकरला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त झाले. विविध टप्पे पार करत 20 मे रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास या चमूने हे शिखर सर केले. गिर्यारोहकांच्या या पहिल्या चमूला पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या, त्यात श्री सुहेल शर्मा हेही दिसत आहेत.
सुहेल विरेंद्र शर्मा हे मुळचे अमृतसरचे असून दहा दिवसांपूर्वीच त्यांची कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. गेल्या वर्षी ते बेस कॅम्पपर्यंत पोहचले होते. मात्र 24 एप्रिलला काठमांडूत झालेल्या भूकंपामुळे बेस कॅम्पवर हिमकडा कोसळली. या घटनेत शर्मा यांच्या सहकार्यांचा मृत्यू झाला तर तेसुद्धा जखमी झाले होते. या घटनेमुळे त्यांना माघारी फिरावे लागले होते.
त्यानंतर हिंमत न हरता, न डगमगता त्यांनी पुन्हा एव्हरेस्टवारी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आई, भाऊ समीर यांनी आपलं मनोबल वाढवल्याचं सुहेल सांगतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन सुहेल शर्मा यांचं अभिनंदन केलं आहे. रफिक शेख आणि सुहेल शर्मा यांची कामगिरी अभिमानास्पद आहे. ते अनेकांसाठी प्रेरणादायी असून मी त्यांना सुयश चिंतीतो, असं मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/734021323769450497
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/734023440454320128
सुहेल शर्मा यांनी मिळवलेलं यश हे पोलिस दलासाठी अभिमानास्पद आहे. एव्हरेस्टवीर सुहेल परतल्यावर त्यांचा महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने सत्कार करण्यात येईल. हा दिवस पोलिस दलासाठी ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित वृत्त :
पोलीस हवालदार रफिक शेखची 'एव्हरेस्ट'ला गवसणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement