(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये आग, दोन कर्मचारी जखमी
Uran Fire: आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास उरण शहरालगत असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या पश्चिमेकडे असलेल्या साठवण टाकीमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे
Uran Fire: आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास उरण शहरालगत असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या पश्चिमेकडे असलेल्या साठवण टाकीमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. उरणच्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यालगत ओएनजीसी कंपनीच्या कंपाऊंडच्या भिंतीचे काम सुरू आहे. याच भिंतीपासून काही मीटरच्या अंतरावर असलेल्या क्रुड- ओईलच्या साठवण टाकीला अचानक आग लागल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती.
यावेळेस, बूस्टर पॉईंटनजीक असललेल्या 'फ्लॅश- पॉईंट' येथील साठवण टाकीला लागलेली आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्या ठिकाणी काम करणारे सुमारे पंचवीस ते तीस कामगारांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून धाव घेतली. अचानक लागलेल्या आगीमुळे त्या ठिकाणी काम करणारे दोन कर्मचारी हे आगीमध्ये भाजले असून त्यांच्यावर उरण येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या आगीत जखमी झालेले हे दोन्ही कर्मचारी हे सुमारे 15 ते 20 टक्के भाजले असल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे कंपनीलगत असलेल्या सुमारे पंचवीस ते तीस घरातील रहिवासी हे घराबाहेर पडून जीव वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर या आगीची माहिती मिळताच कंपनीतील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या या घटनास्थळी पोहोचून सुमारे अर्धा ते पाऊण तासांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते.
प्राथमिक माहितीनुसार, या साठवण टाकीच्या बाजूला वेल्डिंगचे काम सुरू असल्याने क्रुड -ऑईलने पेट घेतली असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या आगीमध्ये 28 वर्षीय बनारसी भुईया आणि 40 वर्षीय बबनू सूरज भूईया हे दोघे सुमारे 20 टक्के भाजले आहेत. दरम्यान, आज लागलेल्या या आगीमुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात लागलेल्या आगीचे आठवण झाल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या