1600 किलोमीटर पाठलाग करून बीड पोलिसांनी कुख्यात चैन चोरांच्या मुसक्या आवळल्या
टोळीच्या मोहरक्यासह इतर तीन साथीदारांना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अटक केली आहे. या टोळीवर वेगवेगळ्या ठिकाणी 27 गुन्हे दाखल असून त्यांच्या चौकशी मधून अजून काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे
बीड : गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला होता अनेक ठिकाणी चेन चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्यात मोठं आव्हान उभं राहिलं. त्यानंतर बीड पोलिसांनी सापळा रचून चार चैन चोरांना पुण्यामधून अटक केली आहे. या चोरांना पकडण्यासाठी बीड पोलिसांनी तब्बल 1600 किलोमीटर त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना बेड्या ठोकल्या आहेत
चेन चोरी करणाऱ्या या टोळीचा मोरक्या हा मूळचा कर्नाटक राज्यातला असून तो पुण्यात राहून आपल्या साथीदारांसह चोऱ्या करून मोठ्या शिताफीने फरार व्हायचा. मागच्या काही दिवसांपूर्वी या टोळीने बीडमध्ये चैन चोरीचा सपाटा लावला होता. या टोळीच्या मोरक्यासह इतर तीन साथीदारांना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अटक केली आहे. या टोळीवर वेगवेगळ्या ठिकाणी 27 गुन्हे दाखल असून त्यांच्या चौकशी मधून अजून काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे
चेन चोरी करण्यासाठी ही टोळी वेगवेगळ्या गाड्यांचा वापर करायची त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे पोलीस त्यांच्या मागावर होते. या टोळीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चोऱ्या केल्या असून पुणे, ठाणे, मुंबई, सोलापूर, उल्हासनगर, नांदेड या सह गोव्यामध्ये देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चेन चोरी केल्यानंतर वेगवेगळी वाहने बदलून ही टोळी फरार व्हायची त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते आणि शेवटी फरार असलेल्या या आरोपींना पकडण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात त्यांनी जे गुन्हे केले आहेत ते उघड होण्यास मदत होणार आहे.
संबंधित बातम्या :