एक्स्प्लोर

ED आणि आयबीही डी-गँगशी संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी NIA मुख्यालयात; सुमारे 18 जणांची चौकशी

NIA : या प्रकरणी मुंबईतील NIA मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली आहे.

NIA : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येत असून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय तपास यंत्रणेने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुंबईत ईडी पथकांच्या अनेक धाडी पडल्या होत्या. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले होते. हे सर्व छापे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर टाकण्यात आले होते. एनआयएने या सर्व व्यक्तींची झाडाझडती घेतली होती व त्यांची कसून चौकशी केली होती. यावेळी एनआयएने अनेक महत्त्वाचे पुरावेही जप्त केले होते. या प्रकरणी मुंबईतील NIA मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली आहे. 

दाऊदसोबत असलेल्या संबंधांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न

ED ने यापूर्वी नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात ईडी चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने नवाब मलिक यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. मलिक यांची दाऊदसोबत असलेल्या संबंधांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न ईडीकडून करण्यात येत आहेत. दाऊद इब्राहिम विरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या तपासादरम्यान मलिकांना 23 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याशी संबंधित जमीन व्यवहाराशी संबंधित दहशतवादी निधी प्रकरणात आरोपी असल्याचंही बोलंल जातंय

सुमारे 18 सदस्यांची चौकशी

चौकशीच्या थेट तिसऱ्या दिवशी मुंबईतील NIA मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली. या सर्वांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही जणांना घरी सोडले, तर काही जण अजूनही NIA ऑफिसलाच आहेत. 18 जणांमध्ये सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे.

NIA चा छापा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे अनेक साथीदार, शार्प शूटर आणि हवाला ऑपरेटर यांच्यावर हे छापे टाकण्यात आले होते. मुंबईतील भेंडीबाजार, माहीम, नागपाडा, गोरेगाव या परिसरात एनआयएने धाडी टाकल्या. माहीम परिसरात चार ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यापैकी एक छापा माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांच्या घरी टाकण्यात आला होता. पोलिसांनी सुहेल खंडवानी यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला ग्रँट रोड येथून ताब्यात घेण्यात आले होते. हे सर्व लोक 93 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात साक्षीदार आहेत किंवा निर्दोष सुटले आहेत. तसेच ते नातेवाईक आहेत किंवा डी-गँगशी जोडलेले आहेत. याबाबत तपास यंत्रणा मनी लाँड्रिंग तसेच या प्रकरणातील आरोपींचे संबंध तपासण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी काही पुरावे मिळविण्यासाठी पोलीस मनी ट्रेल्स आणि बँक स्टेटमेंट तपासत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

El Nino Update : 1950 नंतरचा सर्वात भीषण 'एल निनो' सक्रिय! मान्सूनसाठी धोक्याची घंटा; भारतावर दुष्काळाचे सावट? डिसेंबरमध्ये धारण करणार अतितीव्र रूप
1950 नंतरचा सर्वात भीषण 'एल निनो' सक्रिय! मान्सूनसाठी धोक्याची घंटा; भारतावर दुष्काळाचे सावट? डिसेंबरमध्ये धारण करणार अतितीव्र रूप
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! हार्बर मार्गिकेवर लोकल थांबल्या, सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्वच लोकल एकामागे एक उभ्या, प्रवाशांचे हाल
मोठी बातमी! हार्बर मार्गिकेवर लोकल थांबल्या, सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्वच लोकल एकामागे एक उभ्या, प्रवाशांचे हाल
Jalgaon Vidhan Parishad Election 2026: गिरीश महाजन म्हणाले, नाशिकपाठोपाठ जळगावचा तिढाही सुटला; पण बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंच्या 'त्या' कृतीने भुवया उंचावल्या!
गिरीश महाजन म्हणाले, नाशिकपाठोपाठ जळगावचा तिढाही सुटला; पण बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंच्या 'त्या' कृतीने भुवया उंचावल्या!
Nagpur Women Commandos: दिवसभर शेतीचं काम अन् रात्री गावातल्या 40 महिला कमांडोची दररोज गस्त; कारण ऐकून थक्क व्हाल
दिवसभर शेतीचं काम अन् रात्री गावातल्या 40 महिला कमांडोची दररोज गस्त; कारण ऐकून थक्क व्हाल

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणवर हल्ले थांबवण्याचे आदेश, सेन्सेक्स निफ्टीत तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी कमावले
ट्रम्प यांचे इराणवर हल्ले थांबवण्याचे आदेश, सेन्सेक्स निफ्टीत तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी कमावले
RBI : रिझर्व बँकेची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या सात संचालकांना पदावरून हटवले, सहकार क्षेत्रात खळबळ
रिझर्व बँकेची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या सात संचालकांना पदावरून हटवले, सहकार क्षेत्रात खळबळ
Pune Water Cut : रोज नाही, आता एक दिवसाआड पाणी; पुण्यासाठी महापालिकेचं पाणीपुरवठ्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सविस्तर
रोज नाही, आता एक दिवसाआड पाणी; पुण्यासाठी महापालिकेचं पाणीपुरवठ्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सविस्तर
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
NCP Merger into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा, नाना पटोले दिल्लीला, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा, नाना पटोले दिल्लीला, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
NCP Merge into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
Embed widget