(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊन काळात कोरोना संदर्भात राज्यात 89 हजार गुन्हे दाखल, 51 हजार वाहने जप्त
लॉकडाऊन काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनाही समोर आल्या. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 171 घटनांची नोंद झाली असून यात 657 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते 1 मे या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 89,383 गुन्हे दाखल झाले असून 17,813 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 82,128 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा 628 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1242 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि 51 हजार वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.
'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
पोलिसांवर हल्ला प्रकरणे
लॉकडाऊनच्या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 171 घटनांची नोंद झाली असून यात 657 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 51 पोलीस अधिकारी व 291 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 23 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या 28 पोलीस अधिकारी व 262 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.
BLOG | पोलीस हवालदार, शिपाई अन् नाईक यांच्या व्यथा..
Mumbai police | 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश