भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करु नये : देवेंद्र फडणवीस
भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 5 जून रोजीच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केला आहे. यावर राज्यातील भाजप नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत
Devendra Fadnavis On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातल्या अडचणी कायम आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 5 जून रोजीच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केला आहे. उत्तर भारतीयांची राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी खासदार बृजभूषण सिंह यांनी केली आहे. यावर राज्यातील भाजप नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करु नये असं म्हटलं आहे.
फडणवीस यांनी म्हटलं आहे की, रामाचे दर्शन कोणीही घेऊ शकतो, भगवान रामचंद्रांच्या चरणी येणाऱ्या कुण्याही व्यक्तीचा विरोध केला जाऊ नये. उत्तर प्रदेशमधील खासदार राज ठाकरेंचा विरोध का करत आहेत याबाबत कल्पना नाही. मी बृजभूषण यांच्याशी चर्चा करणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सरकारकडे अपेक्षा ठेवू नये
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं की, राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सरकारकडे अपेक्षा ठेवू नये. राज्य सरकार विरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे, असं ते म्हणाले. राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असं वाटलं नव्हतं. ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं आहे, असंही फडणवीस म्हणाले. याबाबत बोलताना काल प्रवीण दरेकर यांनी म्हटलं होतं की, रामाचे दर्शन कोणीही घेऊ शकतो, त्यामुळे टोकाची भूमिका घेऊ नये. उत्तर भारतीयांच्या बाबतीत जे झालं ते पुन्हा जिवंत करण्याचा ब्रिजभूषण यांचा प्रयत्न असल्याचं दरेकरांनी म्हटलं होतं.
कोण आहेत बृजभूषण सिंह?
बृजभूषण यूपीतील कैसरगंजचे खासदार
सर्वात पहिल्यांदा 1991 मध्ये निवडणूक लढवली
यूपी भाजपमध्ये बृजभूषण यांना महत्वाचं स्थान
बाबरी मशिद प्रकरणात आरोपींमध्ये नाव
आक्रमक वक्तव्यासाठी ब्रिजभूषण प्रसिद्ध
भारतीय कुस्ती महासंघाचेही ते अध्यक्ष आहेत
इतर महत्वाच्या बातम्या
Breaking : राज ठाकरेंना चॅलेंज! उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा अयोध्येत... ; बृजभूषण यांचा इशारा