एक्स्प्लोर

कोरोना पसरवला कुणी? कोरोनावरुन महाराष्ट्र-पंजाब सरकार आमनेसामने, अशोक चव्हाण म्हणाले चूक पंजाबचीच

नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच नांदेडमध्ये देखील अचानक कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळं गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर प्रशासनाने सील केला आहे.

नांदेड : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर नांदेडमध्ये देखील कोरोनाचा आकडा अचानक वाढला आहे. नांदेडहून आलेल्या भाविकांमुळं पंजाबमध्ये कोरोना पसरला असल्याचं पंजाब सरकारनं म्हटलं आहे तर  नांदेडमध्ये पंजाबच्या चुकीमुळं कोरोना पसरला असल्याचा आरोप मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावरुन पंजाब आणि महाराष्ट्र सरकार आता आमने-सामने आलं आहे. नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच नांदेडमध्ये अचानक कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळं गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर प्रशासनाने सील केला आहे. पंजाबमध्ये वाढत्या कोरोना केसेसमुळं खळबळ उडाली आहे. नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. नांदेडहून आलेल्या भाविकांमुळं पंजाबमध्ये कोरोना पसरला असल्याचं पंजाब सरकारनं म्हटलं आहे. मात्र आता मंत्री अशोक चव्हाण यांनी पंजाबवरच नांदेडमध्ये कोरोना पसरवल्याचा आरोप केला आहे.
फेसबुक लाईव्हमध्ये अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, गेल्या आठवड्यापर्यंत एकही रुग्ण नांदेडमध्ये नव्हता मात्र आता हा आकडा 26 वर गेलाय. त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे. 26 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन रुग्ण वगळता बाकीचे 3 जण पंजाबहून आलेले वाहनचालक आहेत तर 20 जण गुरुद्वाराचे सेवेकरी आहेत. त्यामुळं या संक्रमणाचा स्त्रोत नांदेड शहर नसून हे बाहेरुन आलेले लोकं आहेत, हे प्रथमदर्शनी दिसून येतेय, असंही चव्हाण यांनी म्हटलंय.  या गुरुद्वारामधील बाबांनी स्पष्ट केले आहे की, भाविकांची नियमित तपासणी केली जात होती. या भाविकांना नांदेडमुळे लागण झालेली नाही.  या भाविकांना नांदेडमध्ये लागण झाली असती तर आम्ही तपासणी केली असती असं बाबांनी सांगितलं असल्य़ाचं देखील चव्हाण म्हणाले. पंजाबला गेलेले भाविक किंवा तिथून महाराष्ट्रात आलेले वाहनचालक यांना प्रवासात कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं चव्हाण यांनी म्हटलंय. Coronavirus | नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 351 जणांना कोरोना; शहरातील गुरुद्वारा, लंगर साहिब परिसर सील नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज वाढून 26 झाली असली तरी नागरिकांनी भयभीत होऊ नये. परिस्थिती नियंत्रणात असून, सर्वांनी अधिक खबरदारी व सोशल डिस्टन्सिंग बाळगून शासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असंही चव्हाण म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूसCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Embed widget