Corona Third Wave: दिलासादायक बातमी! धारावीत 39 दिवसानंतर शून्य रुग्णांची नोंद
Dharavi Records Zero New Covid-19 Cases: धारावीत सध्या 43 रुग्ण सक्रीय आहेत.
![Corona Third Wave: दिलासादायक बातमी! धारावीत 39 दिवसानंतर शून्य रुग्णांची नोंद Coronavirus: Dharavi records zero new Covid-19 cases for the first time after third wave began Corona Third Wave: दिलासादायक बातमी! धारावीत 39 दिवसानंतर शून्य रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/24/3f56f421f2914389e9770cccb7e999d4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dharavi Records Zero New Covid-19 Cases: मुंबईतील (Mumbai) सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीकरांसाठी आज मोठा दिलासा देणार वृत्त आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी (28 जानेवारी) धारावीत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. धारावीत 20 डिसेंबर 2021 या दिवशी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढललेला नव्हता. धारावीत सध्या 43 रुग्ण सक्रीय आहेत. त्यापैकी 11 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 32 रुग्ण एकतर घरात क्वारंटाईन आहेत किंवा मग संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
तिसऱ्या लाटेनंतर धारावीमध्ये एका दिवसात कोरोनाची शून्य प्रकरणे नोंदवण्यास 39 दिवस लागले. दुसऱ्या लाटेदरम्यान 14 जून 2021 रोजी शून्य रुग्णसंख्येची नोंद होण्यासाठी 119 दिवसांचा कालावधी लागला. तर पहिल्या लाटेनंतर 20 डिसेंबर 2020 रोजी धारावीत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली होती. यासाठी तब्बल 269 दिवसांचा कालावधी लागला होता. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिलीय.
कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्यानंतर 27 डिसेंबरपासून तर, 28 जानेवारीपर्यंत धारावीतील सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 381 पोहचली. धारावीत 7 जानेवारीला एकाच दिवशी सर्वाधिक 150 रुग्णांची नोंद करण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वात जास्त होती. धारावीत पहिल्या लाटेत एका दिवसात सर्वाधिक 94 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, दुसऱ्या लाटेत एकाच दिवशी 99 रुग्ण आढळून आले होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान धारावीतील दाट वस्त्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं पसरेल आणि त्याच्याशी दोन हात करणे आरोग्य यंत्रणेला त्याला तोंड देणे कठीण जाईल, अशी भिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत होती. कोरोनामुळं धारावीत पहिल्यांदा आढळून आलेल्या रुग्णांचा 1 एप्रिल 2020 रोजी मृत्यू झाला.
- हे देखील वाचा-
- Maharashtra: अजितदादा म्हणतात, मास्क न वापरण्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चाच नाही; तर हसन मुश्रीफ म्हणाले चर्चा झाली!
- Coronavirus Update : महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडूमध्ये कोरोनाचा कहर, जाणून घ्या तुमच्या राज्यातील परिस्थिती
- Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी, मृत्यूदर मात्र वाढताच, 'हे' आहे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)