एक्स्प्लोर
कोल्हापूरच्या अंबाबाईला साडीऐवजी घागराचोळी घातल्याने भाविक संतप्त
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाईला घागरा-चोळी परिधान केल्याने भाविक संतप्त झाले आहेत. अंबाबाईला साडीऐवजी घागरा-चोळी नेसवल्याच्या विरोधात भाविकांनी निदर्शन करून पूजाऱ्याचा निषेध केला आहे.
कोल्हापूर महापालिकेत भाजपचे नगरसेवक असलेले श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईला काठापदराच्या साडीऐवजी घागरा-चोळी नेसवण्यात आली. देवीचा हा फोटोही व्हायरल झाला. त्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात मंदिर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्तेही आज मंदिराला घेराव घालणार आहेत. दरम्यान, एका भाविकाने ही 35 हजारांची घागरा-चोळी देवीला अर्पण केल्याचं सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement