Omicron Variant Alert:ओमायक्रॉन आणि ब्लॅक फंगसचा संबंध? जाणून घ्या जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली माहिती
Black Fungus: ज्या पद्धतीने कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढतेय त्या पद्धतीने लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की यानंतरसुद्धा पुन्हा ब्लॅक फंगसचा धोका होऊ शकतो?
![Omicron Variant Alert:ओमायक्रॉन आणि ब्लॅक फंगसचा संबंध? जाणून घ्या जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली माहिती Connection between omicron and black fungus Omicron Variant Alert:ओमायक्रॉन आणि ब्लॅक फंगसचा संबंध? जाणून घ्या जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/29/89a13017279b2d3a0ede2e8fc2308f5c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Omicron and Black Fungus:कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनची संख्या दिवसागणिक वाढतेय. ज्या पद्धतीने ओमायक्रॉनचा वाढता आलेख दिसून येत आहे त्यावरून फक्त दिल्ली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांत याची तिसरी लाट येऊ शकते असे चित्र उभे आहे. या सगळ्यात नागरिकांना सतत एक चिंता भेडसावत आहे ती म्हणजे 'ब्लॅक फंगसची'. कारण याच ब्लॅक फंगसने गेल्या दोनही कोरोनाच्या लाटांत धुमाकूळ घातला होता.
अशातच देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना पुन्हा एकदा नागरिकांमध्ये ब्लॅक फंगसविषयी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकतर लोक हाच विचार करून घाबरतात की कोव्हीड-19 आणि डेल्टा व्हेरियंटप्रमाणे ओमायक्रॉनचे रूग्णदेखील ब्लॅक फंगसचे बळी ठरू शकतात का? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. जाणून घेऊयात याबाबत माहिती...
ब्लॅक फंगस प्रभावी नाही
ओमयाक्रॉन व्हरियंटबाबत आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये ब्लॅक फंगसच्या केसेस आढळून येत नाहीत. हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि वारंवार संक्रमणातून हा व्हायरस आपलं रूप बदलतो आहे. त्यामुळे या व्हायरसकडे दुर्लक्ष करू नका.
जागतिक आरोग्य संघटनानं (WHO)दिलेली माहिती
झपाट्याने वाढणाऱ्या या ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडून वारंवार मार्गदर्शक तत्वे आणि माहिती दिली जाते. या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन व्हेरिंयंटची गंभीरता समजून घेण्यास सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे की, ओमायक्रॉनची लक्षणे जरी सौम्य असली तरी याकडे दूर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा कोरोनाचाच एक व्हेरियंट आहे. तूर्तास ओमायक्रॉन आणि ब्लॅक फंगसमध्ये हाच संबंध आहे की या दोघांत कोणताच संबंध नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे ही वाचा -
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट ; शास्त्रज्ञांचा अंदाज
- Coronavirus Cases Today : चिंता वाढवणारी आकडेवारी; देशात कोरोना रुग्णांमध्ये 56% नी वाढ, 24 तासांत 90 हजारांहून अधिक रुग्ण
- Maharashtra Corona Update : राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ, बुधवारी तब्बल 26 हजार 538 रुग्णांची नोंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)