Maharashtra Corona Update : राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ, बुधवारी तब्बल 26 हजार 538 रुग्णांची नोंद
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 26 हजार 538 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 25 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज 144 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 144 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 797 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 330 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मागील पाच दिवसातील रूग्ण संख्या
4 जानेवारी - 18 हजार 466 रूग्ण
3 जानेवारी - 12, 160 रूग्ण
2 जानेवारी - 11, 877 रूग्ण
1 जानेवारी - 9,170 रूग्ण
31 डिसेंबर - 8067 रूग्ण
राज्यात आज 8 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 87 हजार 505 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 24 हजार 247 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.55 टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 13 हजार 758 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1366 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 97 , 77, 007 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 15 हजार 166 नव्या रुग्णाची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे. मागील 24 तासांत 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या 15 हजार 166 रुग्णापैकी 1218 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. इतर रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मुंबईतील सक्रीय रुग्णाची संख्या 61,923 इतकी झाली आहे. मुंबईत सध्या 30565 बेड्समधील 5104 बेड्स सध्या वापरात आहेत. मुंबईतील 462 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर 20 कंटेमेंट झोन आहेत.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा पार
Coronavirus In Mumbai: मुंबईतील रुग्णसंख्या वाढली; गेल्या 24 तासात 10 हजार 860 रुग्णांची भर