एक्स्प्लोर
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य : पृथ्वीराज चव्हाण
सरकार पाच वर्ष टिकण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. सरकार पाच वर्ष टिकण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे आपण वाट बघूया असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात महाविकास आघडी होईल असं अनेकांना वाटलं नव्हतं. राज्यात भाजपने ज्या प्रकारे काम केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं यामुळेच महाविकास आघडीचं सरकार अस्तित्वात आलं. तीन पक्षाचं मंत्रिमंडळ बनवणं काही सोप काम नाही. पहिल्या टप्प्यात आम्ही जागांची पक्षाला मिळणाऱ्या जागांची वाटणी केली. आता आमच्या पक्षाच्या वाट्याला ज्या 12 जागा आल्या आहेत. त्यातलं कोणतं खातं कुणाल मिळणार हे आमचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी ठरवतील. याबाबतची निर्णय प्रकिया दिल्लीमध्ये चालू आहे. आज-उद्यामध्ये संपेल आणि आपल्याला याबाबत सर्वांना कळेल असही चव्हाण म्हणाले.
झारखंडच्या विजयावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य जिंकली तरी काँग्रेसला उभारी घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच भाजपचा लोकसभेत विजय झाला पण, गुजरातच्या विधानभा निवडणुकीपासून भाजपला राज्यात म्हणावं तसं यश आलेलं दिसलं नाही. महाराष्ट्र, हरयाणामध्येही भाजपला हवं तसं यश मिळालं नाही. झारखंडमध्ये तर 'अब की बार 65 पार'च्या घोषणा दिल्या होत्या. पण निम्म्यासुद्धा जागा भाजपला मिळवता आल्या नसल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
देशातील अर्थव्यवस्था कोसळली असून त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही आहे. तसेच भाजप ते स्वीकारायला देखील तयार नाही आहे. एकंदरीतचं भाजपकडून भारतीय अर्थव्यवस्था काही नीट सांभाळली जात नसून. त्याचा फटका रोजगारावर, शेती, उद्योग व्यवसायावर होतं असल्याचं चव्हाण म्हणाले. तर दुसऱ्या बाजूला बालाकोट सारखा प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा, 370 यांसारख्या विषयांवर भाजपने लोकसभा जिंकली, पण सारखे सारखे 370, तिहेरी तलाक, सुधारित नागरिकत्व कायदा या मुद्दयामुळे देशाचं स्थैर्य कुठेतरी धोक्यात आल्याची भावना लोकांच्या मनात आली आहे, त्यामुळे आपल्याला झारखंडमधील हा निकाल दिसतं असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement