एक्स्प्लोर

पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता नाही

महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचं, म्हणजे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं नेमकं काय होतं याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. दिल्लीतून हायकमांडचा जो कल मिळतोय त्यानुसार अशोक चव्हाण यांच्या समावेशाची शक्यता असली तरी पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिपदापेक्षा दुसरी जबाबदारी दिली जाऊ शकते.

नवी दिल्ली : राज्याच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण दिसणार, पण पृथ्वीराज चव्हाण मात्र नसणार...दिल्लीतल्या हायकमांडच्या चर्चेत हा निर्णय आता जवळपास निश्चित झाला आहे. या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात कसं समाविष्ट करायचं याचा पेच होता. काँग्रेसचे हे दोनही माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री हट्टाने विधानसभा निवडणूक लढले. अशोक चव्हाण लोकसभेला पराभूत झाले, पण विधानसभेत जिंकले. तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेचा आग्रह नाकारत विधानसभेच्याच निवडणुकीला प्राधान्य दिलं. राज्यात अच्छे दिन येणार याची कुणकुण दोघांना लागली होती की माहिती नाही, पण सत्ता आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाला मात्र हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळताना दिसत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना मिस्टर क्लीन समजलं जातं. ते खरंतर काँग्रेसच्या गांधी घराण्याशी निष्ठावंत मानले जातात. पण त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की त्यांची केमिस्ट्री जितकी सोनिया गांधींशी जुळत होती तितकी राहुल गांधींसोबत जुळत नाही. याचमुळे त्यांना मंत्रिपद देण्यापेक्षा इतर काही जबाबदारी द्यावी असं दिल्लीतून ठरत आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खरंतर राष्ट्रीय राजकारणात अधिक शोभणारे. पण गेल्या पाच वर्षांत त्यांनी राज्यातल्या राजकारणावर अधिक भर दिला. सरकारला धारेवर धरण्यात, नवेनवे मुद्दे शोधण्यात त्यांचा पुढाकार असायचा. पण तरीही अनेक काँग्रेस आमदार मात्र त्यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचं बोललं जातं, मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी क्लीन इमेज तर जपली, पण काँग्रेसच्या संघटनवाढीकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं असाही त्यांच्यावर आरोप होतो. काँग्रेसच्या वाट्याला महसूल, उर्जा, पीडब्लूडी अशीच खाती आहेत. त्यातही महसूल खातं बाळासाहेब थोरात यांनाच मिळण्याची शक्यता आहे. अर्थ, गृह ही खाती मित्रपक्षांकडे आहेत. त्यामुळे उरलेल्या दुय्यम खात्यांसाठी माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात यावं का असाही सवाल काहीजण उपस्थित करत होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार बनवण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचाही मोठा पुढाकार होता. शिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कसलाही आरोप नाही. फडणवीसांच्या 80 तासांच्या सरकारला खाली खेचण्यासाठी सुप्रीम कोर्टातली महत्वाची लढाई लढण्यासाठीही त्यांच्यावर जबाबदारी होती. पण आता मोजकी मंत्रिपदं येत असताना पुन्हा जुन्यांचीच खोगीरभरती करण्यापेक्षा नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाकडून मंत्रिपदापेक्षा इतर काही मोठी जबाबदारी दिली जाणार का याची उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget