![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
संभाजी भिडेंसह 80 जणांवर गुन्हा दाखल, बंडातात्या कराडकर यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चा प्रकरणी कारवाई
संभाजी भिडे गुरुजींसह 80 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल कराड शहरात मोर्चा काढून गर्दी गोळा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
![संभाजी भिडेंसह 80 जणांवर गुन्हा दाखल, बंडातात्या कराडकर यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चा प्रकरणी कारवाई case has been registered against 80 people including Sambhaji Bhide at karad satara संभाजी भिडेंसह 80 जणांवर गुन्हा दाखल, बंडातात्या कराडकर यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चा प्रकरणी कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/08/6504b826219aa9e222dd49d234e858a9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : संभाजी भिडेंसह 80 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात कराड शहरात मोर्चा काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानबद्ध केलेल्या बंडातात्या कराडकरांच्या समर्थनार्थ संभाजी भिडे यांनी काल कराडमध्ये मोर्चा काढला होता. याच प्रकरणी 80 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग आणि 144 कलमांतर्गत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. पायी वारीसाठी त्यांनी अट्टाहास केला होता. त्यानंतर पायी वारी सुरु करणाऱ्या बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांचं समर्थन करण्यासाठी संभाजी भिडे गुरुजी कराडमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही होते. कराडमधील छत्रपती शिवाजी चौकात सर्व कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा थेट तहसीलदार कार्यालयात जाऊन धडकला आणि तिथे तहसिलदारांना निवेदन देण्यात आलं होतं. तसेच तेथील एका मंदिराचा दरवाजा उघण्यास भाग पाडलं आणि त्यांनी त्या मंदिरात प्रवेशही केला.
या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही डावलण्यात आले होते. तसेच मोर्चादरम्यान, 144 कलाचा भंगही करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर करडा पोलीस ठाण्यात संभाजी भिडे आणि त्यांच्यासोबत मोर्चामध्ये सहभागी असलेल्या 80 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नसून सोमवारी संध्याकाळी उशीरा हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, सध्या राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. अशातच हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तसेच बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)