एक्स्प्लोर
सोलापूर-दुधणी स्थानकादरम्यान इंजिनसह मालगाडीचे डबे घसरले

सोलापूर: सोलापूरमधील दुधणी स्थानकादरम्यान इंजिनसहित मालगाडीचे काही डबे घसरले. वाडीहून होटगीला मालगाडी जात असताना रूळाला तडे गेल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक समजतं आहे. रेल्वे पोलिस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रूळ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 1 वाजता हा अपघात झाला. या अपघातात इंजिनासह पाच डबे घसरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं समजतं आहे. दरम्यान, या अपघातामुळे रेल्वे रुळाला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून सध्या रुळाच्या दुरुस्तीची काम सुरु आहे. या अपघातामुळे दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून सर्व गाड्या उशिरानं धावत आहेत. मालगाडी रुळावरून घसरल्याने या गाड्यांचे मार्ग बदलले 1)पुणे-सिकंदराबाद , शताब्दी एक्स्प्रेस 2) मुंबई- हैद्राबाद, हुसेन सागर एक्सप्रेस 3) कुर्ला-कोईमतूर 4) बंगळुरू-मुंबई, उद्यान एक्सप्रेस 5) नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस 6) कुर्ला- विशाखापट्टणम 7) भुवनेश्वर-मुंबई ,कोणार्क एक्सप्रेस 8) कन्याकुमारी-मुंबई, जयंती-जनता एक्सप्रेस 9) बंगळुरू- नवी दिल्ली, केके एक्सप्रेस 10) बागलकोट- म्हैसूर, बसव एक्सप्रेस 11) सोलापूर-यशवंतपूर, सुपरफास्ट
आणखी वाचा























