(Source: Poll of Polls)
Pune Fire : दोन दिवसात आगीच्या दोन घटना; मध्यरात्री पुण्यात बर्निंग कारचा थरार
पुणे जिल्ह्यातील आहिरे गाव कमान, वारजे परिसरात कारला आग लागली होती. काल मध्यरात्री ही घटना घडली होती. सुदैवाने या कारच्या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही.
Pune Fire : पुणे जिल्ह्यातील (Pune) आहिरे गाव कमान, वारजे (Warje) परिसरात कारला आग (Pune Fire) लागली होती. काल मध्यरात्री ही घटना (Pune news) घडली होती. सुदैवाने या कारच्या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाहीत. मात्र मध्यरात्री लागलेल्या आगीने अनेकांची तारांबळ उडाली होती. मारुती कंपनीचे आल्टो होती. सीएनजीची कार असल्याने या कारने लगेच पेट घेतला होता. त्यामुळे वारजेकरांनी मध्यरात्री बर्निंग कारचा थरार अनुभवला. कार संपूर्ण जळून खाक झाली आहे. त्यामुळे मालकाचं मोठं नुकसान झालं आहे.
या सगळ्या घटनेची माहिती मिळताच तातडीने वारजे अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले होते. कारमध्ये कोणीही नसल्याची माहिती घेतली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच मारा सुरु केला. मात्र आगीचं नेमकं कारण काय आहे? याबाबतची माहिती अजून मिळाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गाड्यांच्या आगीच्या घटनेत वाढ
राज्यातील अगीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याची कारणं मात्र वेगवेगळी आहे. कालच पुण्यात चालत्या खाजगी बसने पेट घेतला होता. यामध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते. खाजगी बस घोडेगाववरुन भीमाशंकरकडे जात होती. त्या दरम्यान ही घटला घडली आहे. सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्याने थोडक्यात प्रवाशांचा जीव बचावला आहे. नाशिकमधील बसच्या आगीची घटना ताजी असताना पुण्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. या बसमधील प्रवासी सुखरुप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिकमध्ये बस जळून बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. पुण्यात याची पुनरावृत्ती होता-होता टळली. भीमाशंकरला जाणारी मिनी बस जळून खाक झाली. सुदैवाने 27 भाविक सुखरुप आहेत. समोरुन येणाऱ्या एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने ही मोठी दुर्घटना टळली.
हलगर्जीपणामुळे अनेकांचं मोठं नुकसान
अनेक नागरिक सोयीसाठी खासगी गाडीने प्रवास करतात. जास्तीचे पेसे घातवत प्रवास सुखकर होण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र याच दुर्घटनेत सध्या वाढ झाली आहे. कार मालकांचं मेन्टेनन्सकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असल्याचं वारंवार बोललं जात आहे. त्यामुळे खासगी कारच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गाडीची योग्य काळजी घ्या, वेळेवर सर्व्हिसिंग करा, गाडी उन्हात पार्क करु नका शिवाय गाडीत आगवर्धक पदार्थ ठेवू नका, अशा प्रकारच्या सूचना नागरिकांना वारंवार देण्यात येतात. मात्र त्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचं मोठं नुकसान होत असल्याचं चित्र आहे.