एक्स्प्लोर
नेवाश्यात ओढ्याला आलेल्या पुरात तरुण वाहून गेला, शोधमोहीम सुरु
नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यात जोरदार पावसाने ओढ्याला आलेल्या पुरात अक्षय अशोक गवळी हा तरुण वाहून गेला आहे. पुलावरील संरक्षक दगडाच्या वरुन जाताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अक्षयचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्यावेळेस पाण्याच्या जोर जास्त असल्याने ही घटना घडली.
नेवासा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. नागरिकांनी व प्रशासनाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीची वेळ व पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवरा नदीपर्यंत शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही
अक्षय हा शहरात बांधकाम कारागीर आहे. आज दुपारी झालेल्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मारुतीनगर हे शहरापासून दोन किमी अतंरावर आहे. तिकडे जाण्यासाठी ओढा पार करुन जावे लागते.
आज झालेल्या या जोरदार पावसाने या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. संरक्षक दगडाच्या वरुन पाणी वाहत होते. अक्षय गवळी व त्याचे साथीदार कामावरुन घरी चालले होते. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अक्षयचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहाने तो खोल पाण्यात जाऊन तसाच वाहत पुढे गेला.
दरम्यान, नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने तो पूल पाण्याखाली वाहून गेल्याने भानसहिवरेकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. माळीचिचोंऱ्याचा संपर्कही तुटला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement