एमपीएससी परीक्षेत परप्रांतीयही करु शकतील अर्ज? नगरविकास खात्याच्या जाहिरातीतील 'ही' अट वगळल्यानं भाजप आक्रमक
महाभकास आघाडीचं मराठी प्रेम बेगडी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे.
मुंबई : नगरविकास खात्याच्या नगररचना पद भरतीच्या जाहिरातीवरुन भाजप आक्रमक झाली आहे. जाहिरातीत उमेदवार राज्यातील रहिवासी असावा, ही अट काढल्यानं आता भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.
पूर्वी ज्या वेळी अशा जाहिराती निघायचा तेव्हा उमेदवार राज्यातील रहिवासी असणे ही अट गरजेची होती. महाभकास आघाडीचं मराठी प्रेम बेगडी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे. 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात ही अट होती ती का वगळली याचे उत्तर सरकारने द्यावे अन्यथा ही अट पूर्णस्थापित करा अन्यथा कोर्टात जाऊ असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
राज्यातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे ही अट वगळण्यात आली असल्यावरून आमदार भातखळकर यांनी ठाकरे सरकारला त्याबाबत जाब विचारला आहे. तसेच रोजगाराकरिता महाराष्ट्रातल्या लोकांना प्राधान्य देऊ अशा फुशारक्या मारणार्या सरकारने नगररचनाकारांच्या संदर्भातील 2018 सालची उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे ही अट का वगळली या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं आणि ही अट पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणली पाहिजे अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- 'पांढऱ्या सोन्या'ला झळाळी; अकोल्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 11 हजारांचा भाव
- तब्बल 17 लाखांच्या सोयाबीनची चोरी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे 24 तासांत चोरीचा माल परत
- परदेशी संकरीत गायी आणि बकऱ्यांच्या आयातीबाबत परवानगी मिळावी, सुनिल केदार यांनी घेतली केंद्रीय मंत्री रुपाला यांची भेट
-
Black Box : मुंबई लोकलमध्ये ब्लॅक बॉक्स बसवणार, अपघातावेळचा तपशील जतन होणार