परदेशी संकरीत गायी आणि बकऱ्यांच्या आयातीबाबत परवानगी मिळावी, सुनिल केदार यांनी घेतली केंद्रीय मंत्री रुपाला यांची भेट
पशुसंवर्धनाच्या मुद्याबाबत राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांची भेट घेतली. यावेळी केदार यांनी विविध मागण्या केल्या आहेत.
![परदेशी संकरीत गायी आणि बकऱ्यांच्या आयातीबाबत परवानगी मिळावी, सुनिल केदार यांनी घेतली केंद्रीय मंत्री रुपाला यांची भेट Dairy and Animal Husbandry Minister Sunil Kedar meets Union Animal Husbandry Minister Purushottam Rupala परदेशी संकरीत गायी आणि बकऱ्यांच्या आयातीबाबत परवानगी मिळावी, सुनिल केदार यांनी घेतली केंद्रीय मंत्री रुपाला यांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/04bb0d40c94b3a65de44ddf58d65b5d9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunil Kedar : राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केदार यांनी पशुसंवर्धनविषयी त्यांच्याकडे काही मागण्य केल्या आहेत. तसेच केंद्र सरकारचे सहकार्य मिळावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. जनावरांचा विम्याचा निधी, राष्ट्रीय पशुधन मिशनअंतर्गत राज्याकडून येणाऱ्या प्रस्तावास मंजुरी आणि परदेशी संकरित गायी आणि बकऱ्यांना आयातीबाबत परवानगी मिळावी अशा पशुसंवर्धनविषयीच्या महत्वाच्या विषयांवर केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला आणि महाराष्ट्राचे मंत्री सुनील केदार यांच्यात पार पाडली.
मंत्री केदार यांनी केंद्रीय मंत्री रूपाला यांची दिल्लीतील कृषी भवन येथे भेट घेतली. या बैठकीत राज्याशी निगडीत पशुसंवर्धन विषयावर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील जनावरांच्या विमासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आलेला आहे. केंद्राकडून या प्रस्तावास मंजुरी मिळावी तसेच याबाबतचा निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी केदार यांनी यावेळी केली. यासह राष्ट्र पशुधन मिशनमध्ये विविध जाती विकसित करण्याबाबत प्रस्तावास मंजुरी मिळावी. या मिशनअंतर्गंत मिळणारा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणीही यावेळी केदार यांनी रुपाला यांच्याकडे केली. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पशुच्या विविध जातीचे संकर विकसित करण्यास गती येईल, असेही केदार यांनी यावेळी सांगितले.
भारतीय गीर जातीच्या गायींवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अधिक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरित गीर गाय दिवसाला 25 ते 27 लीटर दूध देते. या गीर जातीच्या गायी भारतात आणून शेतकऱ्यांना द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्यांचा जोडधंधा म्हणून असणाऱ्या दुग्ध व्यवसायात भरभराट येईल. सानेन या जातीच्या बकऱ्या ज्या दिवसाला 10 ते 12 लीटर दूध देतात. या बकऱ्या महाराष्ट्रात आणण्याची परवानगी मिळावी, जेणेकरून या बकऱ्यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीही केदार यांनी केंद्रीय मंत्री रुपाला यांच्याकडे केली. या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इस्रायल येथे मोठया प्रमाणात आहेत. पशुंच्या आयातीसंदर्भात परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालयाकडून काही परवानग्यांची आवश्यकता असते, त्या मिळण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणीही यावेळी केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)