एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सूर्यग्रहणानंतर अंघोळ करावी लागते, पाईपलाईन दुरुस्तीचं काम पुढे ढकला; भाजप नगरसेविकेची मागणी
हिंदु धर्मात ग्रहणकाळानंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्यामुळे गुरुवार ऐवजी अन्य दिवशी देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी खर्डेकर यांनी केली.
पुणे : सूर्यग्रहण झाल्यानंतर लोकांना अंघोळ करावी लागते त्यामुळे गुरुवारी होणारं पाईपलाईन दुरुस्तीचं काम पुढे ढकला अशी अजब मागणी पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मंजूश्री खर्डेकर यांनी केली. गुरुवारी (25 डिसेंबर) सूर्यग्रहण आहे, या पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी बंद ठेवण्यात येतो. परंतु यावेळी सूर्यग्रहण असल्यामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवू नये अशी मागणी मंजूश्री खर्डेकर यांनी केली आहे.
बुधवारी (२५ डिसेंबर) दर्श अमावस्या आहे तर गुरुवारी (२६ डिसेंबर) सूर्यग्रहण आहे. हिंदु धर्मात ग्रहणकाळानंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्यामुळे गुरुवार ऐवजी अन्य दिवशी देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी खर्डेकर यांनी केली.
Manjushri khardekar | सूर्यग्रहणामुळे भाजप नगरसेविका मंजुश्री खर्डेकरांची अजब मागणी | पुणे | ABP Majha
दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरेश्या दाबाने आलं नाही तर लोकांना ग्रहणानंतर आंघोळ करता येणार नाही आणि त्यामुळे लोकांच्या विनंतीवरूनच आपण महापालिकेकडे ही मागणी केल्याच खर्डेकर यांनी म्हटलंय यासंदर्भात मंजूश्री खर्डेकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धिरज घाटे यांना निवेदनही दिले आहे. त्यामुळे या मागणीबाबत पुणे महापालिका काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यावर आपणी ही मागणी लोकांच्याच विनंतीवरून करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जे पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, त्या पुण्यातील असलं अंधश्रद्धेचं ग्रहण कधी दूर होणार हाच प्रश्न आहे. पुण्यात दिवसाआड पाणीप्रश्नासाठी आंदोलनं होतात, महापालिकेवर मोर्चा होतो, तेव्हा कोणी नगरसेवक का नाही महापालिकेची दारं ठोठावत, असाच प्रश्न पुणेकर विचारतायत.
संबंधित बातम्या :
नाताळच्या सुट्ट्यामुळे चार लाख पर्यटक दाखल झाल्याने पंढरपूर ओव्हर पॅक, शिर्डीतही ख्रिसमसचे रंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement