एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाताळच्या सुट्ट्यामुळे चार लाख पर्यटक दाखल झाल्याने पंढरपूर ओव्हर पॅक, शिर्डीतही ख्रिसमसचे रंग
कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. नाताळच्या गर्दीच्या वेळी सकाळी तीन तास मंदिर बंद असल्याने गुरूवारी दुपारनंतरच दर्शनाचा लाभ भक्तांना घेता येणार आहे.
पंढरपूर : सध्या सुरु असलेल्या नाताळाच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये ओव्हर पॅक गर्दी सुरु आहे. या दहा दिवसात मंदिर समितीने ऑनलाईन आणि व्हिआयपी दर्शन पूर्णपणे बंद केल्याने देशभरातून आलेल्या पर्यटकांना विठुरायाच्या सुखकर दर्शनाचा आनंद घेता येत आहे. नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये 8 ते 10 दिवस पंढरपूरमध्ये अशी गर्दी असते या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने गोपाळपूर पर्यंत तात्पुरती दर्शन रांग उभी केली असून या दर्शन रांगेत भाविकांना पिण्याच्या पाण्यासह सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या सुट्ट्यात येणारे बहुतांश पर्यटक हे शहरी भागातून येत असून सध्याच्या प्रचंड गर्दीमुळे 10 दिवस ऑनलाईन दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. याचसोबत दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित व्हिआयपी देखील रांगेतून दर्शन घ्यावे लागत असल्याने पर्यटकातून समाधान व्यक्त होत आहे.
आज पंढरपूर शहर शहरी पर्यटकांमुळे यात्रेसारखे फुलले असून पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक , गुजरात सह देशाच्या विविध भागातून जवळपास 4 लाख पर्यटक दाखल झाले आहेत. उद्या सूर्यग्रहण असाकल्याने मंदिराने विठुरायाच्या नित्योपचारात बदल केले असले तरी याचा पर्यटकांच्या संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या विठ्ठल दर्शनाची रांग थेट चंद्रभागा घाटापर्यंत पोचली असून देवाच्या पायावरील दर्शनाला 5 ते 6 तास एवढा वेळ लागत आहे. शहरात प्रशासनाने उभारलेले सर्व वाहनतळ वाहनांनी भरून गेले असून अशीच अवस्था शहरातील हॉटेल आणि लॉजेसमध्ये दिसू लागली आहे.
शिर्डीतही नाताळचे रंग
देशभरात ख्रिसमस सणाची धूम सुरू असताना नाताळचे रंग आज शिर्डीतही बघायला मिळाले. अनेक साईभक्तांनी सांताक्लाॅजच्या टोप्या घालून साईदर्शन घेतल्याने ख्रिसमसचे रंग शिर्डीतही बघायला मिळाले. आज नाताळच्या निमित्ताने अनेक चर्चमध्ये गर्दी दिसत असताना शिर्डीतही भाविकांनी साईदर्शनला हजेरी लावली. सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या मंदिरात प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. साई बाबांवर प्रत्येक धर्मातील लोकांची श्रद्धा असून अनेकजण शिर्डीत येऊन साईदर्शन घेऊन आपला उत्सव साजरा करत असतात. दरम्यान आज पासून नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डीत साईभक्त मोठ्या संख्येने हजेरी लावणार असून साई संस्थान साईभक्तांच्या सुविधेसाठी सज्ज झालं आहे. 31 डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेता साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंकणाकृती सूर्यग्रहणामुळे साई मंदिर तीन तास बंद
उद्या, गुरुवारी कंकणाकृती सुर्यग्रहणाच्या दिवशी शिर्डी साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गुरुवार 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.05 ते सकाळी 11 याकाळात कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. नाताळच्या गर्दीच्या वेळी सकाळी तीन तास मंदिर बंद असल्याने गुरूवारी दुपारनंतरच दर्शनाचा लाभ भक्तांना घेता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
Advertisement