एक्स्प्लोर
भिवंडीत लिपिक महिलेच्या पतीचा कान कापला
![भिवंडीत लिपिक महिलेच्या पतीचा कान कापला Bhiwandi Ear Cut After Attacking Lady Clerks Husband भिवंडीत लिपिक महिलेच्या पतीचा कान कापला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/29081626/bhiwandi-2-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भिवंडी : लिपिक महिलेच्या ग्रामसेवक पतीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात आरोपींनी पीडित तरुणाचा कान कापल्याची माहिती आहे. जखमी निलेश गोरलेंवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असताना महिला लिपिकाची नेमणूक केली, त्याशिवाय मदरशाला परवानगी दिल्यामुळे वाद उसळला होता. याच रागातून लिपिक महिलेच्या ग्रामसेवक पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
हल्लेखोरांनी डोहळे नाक्यावर निलेश यांची स्विफ्ट कार अडवली. त्यानंतर लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात निलेश यांच्या डोक्यावर वार करुन उजवा कानही कापण्यात आला. भिवंडीतील भोकरी परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला.
या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात सात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चौघांना सोमवारी अटक करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)